esakal | व्यापाऱ्यांचा हात दुकानात नव्हे आता घरकामात व्यस्त

बोलून बातमी शोधा

mahendra agrawal

रेसिपी बनविणे, साफसफाई, बागकाम, मुलांशी खेळणे त्यांच्याशी गप्पा मारणे आदी कामांत रमले आहेत. 

व्यापाऱ्यांचा हात दुकानात नव्हे आता घरकामात व्यस्त
sakal_logo
By
श्रीकांत जोशी

भुसावळ : नेहमी व्यवसायात बिझी असलेल्या व्यापारी बंधूंनी सध्या विविध घरकामात स्वतः:ला गुंतवून आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. यात विविध रेसिपी बनविणे, साफसफाई, बागकाम, मुलांशी खेळणे त्यांच्याशी गप्पा मारणे आदी कामांत रमले आहेत. 

विविध खाद्यपदार्थ तयार करतो 
महेंद्र अग्रवाल (संचालक, तापी स्टील, भुसावळ) : मला सुरवातीपासूनच विविध खाद्यपदार्थ तयार करून घरच्यांना खाऊ घालण्याची आवड आहे. सध्या तर घरीच असल्याने सकाळी वेगवेगळा नाश्‍ता बनवतो. माझी आई 85 वर्षांची असून तिला माझ्या हातचे धिरडे आवडतात. ते देखील बनविले. चार दिवसापासून सूनबाई बरोबर साबुदाणा व बटाटा यांचे पापड बनवत आहे. 

घरातील पडतील ती कामे करतो 
मुकेश मधानी (संचालक, नानक जनरल स्टोअर्स) : इतके दिवस घरी थांबण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे. सकाळी पूजा आटोपल्यावर नातवंडांशी खेळतो. यात सापशिडी, लुडो, बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहे. स्वयंपाक व धुणीभांडी सोडून घरातील पडेल ती कामे करतो. आतापर्यंत घराची साफसफाई केली. दोन्ही पाण्याच्या टाक्‍या साफ केल्या. घरातील तीन दुचाकी धुतल्या. जुजबी नॉलेज असल्याने नळदुरुस्ती व इलेक्‍ट्रिकची घरातील किरकोळ कामे करत आहे. 

बगीच्यासाठी रोज एक तास 
सचिन मनवानी (संचालक, गुरुनानक क्‍लॉथ स्टोअर्स) : सध्या घरी असल्याने भरपूर वेळ आहे. मला व माझ्या पत्नीला सकाळी उठून धावण्याची आवड आहे. साधारण दहा किलोमीटर धावतो. आता खुर्चीवर चार किलोमीटर होईल एवढे धावतो. नंतर योगासन करतो. बगिच्याची देखभाल करण्यासाठी एक तास देतो. सगळ्यांसाठी कधी चहा तर कधी कॉफी बनवतो. संध्याकाळी मुलांसोबत कॅरम व क्रिकेट खेळतो. तर कधी बौद्धिक गेम खेळताना मजा येते. 

वडिलांशी व्यापारा संदर्भात चर्चा 
कल्पेश मानवांनी (संचालक, शीतल एंटरप्राइजेस) : सकाळी योगासन व मेडिटेशन करतो. रामायण मालिका पाहतो. त्यात मन रमते. दुपारी वडिलांसोबत बसून भविष्यातील व्यापार धोरणावर चर्चा करतो. झालेले नुकसान कशा प्रकारे भरून काढायचे याबाबत त्यांचे मार्गदर्शन मला निश्‍चितच उपयोगी ठरेल. 

घरातील मुलांना सांभाळतो 
दर्शन नागदेव (हरीदर्शन मोबाईल, जळगाव) : सध्या घरीच असल्याने माझ्या साडेतीन वर्षांच्या मुलीला सांभाळण्याचे काम करतो. त्यामुळे तिच्या आईला घरातील कामे निर्धास्तपणे करता येतात. भावाच्या मुलांशी घराच्या कंपाउंड मध्ये खेळतो.