कोरोनाचे सावट तरी त्यांची लपाछपी सुरूच...प्रशासनाची डोकेदुखी वाढली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

अनेक जण यातून सुटले आहेत. मात्र, तरीही गेल्या आठवडेभरात  मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणाहून सुमारे दोनशे जण लपूनछपून शहरात दाखल झाले असून बिनधास्त फिरत आहेत.

अमळनेर : तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा जिल्ह्यात सर्वधिक आहे. बाहेर गावाहून लपूनछपून आलेल्यांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेकांनी माहिती लपवल्याने त्यांना शोधण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे.

क्‍लिक करा - Video एमआयडीसी ठाण्यासाठी "टिकटॉक सिंघम'ची निवड!; निरीक्षकाच्या व्हायरल व्हीडीओची चर्चा

गेल्या महिनाभरापूर्वी बाहेर गावाहून आलेले सुमारे सहा हजार जण होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील अनेक जण यातून सुटले आहेत. मात्र, तरीही गेल्या आठवडेभरात  मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणाहून सुमारे दोनशे जण लपूनछपून शहरात दाखल झाले असून बिनधास्त फिरत आहेत.

पोलिसांनी गस्त वाढवावी
धुळेकडून चोपडाई- कोंढावळ येथे चेकपोस्ट आहे. मात्र, याच मार्गाने लपूनछपून व पोलिसांना खोटी कारण सांगत अनेक जणांनी तालुक्यात प्रवेश केला आहे. यासाठी पोलिसांनी अधिक गस्त घालण्याची गरज आहे. तसेच जे आले आहेत त्यांचे वाहन क्रमांक, नाव व पत्ता याची नोंदणी करणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
बाहेरून अलेल्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तरीही प्रशासनाकडून बाहेरून आलेल्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याची माहिती घेऊन बाहेरून अलेल्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळे संपूर्ण तालुक्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. ढेकू रस्त्यावरील गुलमोहर कॉलोनी, पिंपळे रस्ता, पैलाड यासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बाहेरून लपूनछपून आलेल्यांचा समावेश आहे.

अमळनेरमुळे जिल्हा 'रेडझोन'
शहरातील साळी वाडा भागातील दाम्पत्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. तालुक्यात तेरा जण कोरोनाग्रस्त असुन चार जणांचा मृत्यू झाला आहे. 101 जण जळगाव येथे क्वारंटाईन झाले आहेत. अमळनेर टॉप असल्याने जिल्हा 'रेडझोन' ठरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus amalner city coming people