esakal | coronavirus एसटी, रेल्वेस्थानकावर तपासणी नाहीच 

बोलून बातमी शोधा

corona cheaking

जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर तपासणी कक्ष सुरू करण्याची गरज आहे. जर याठिकाणी आलेल्या प्रत्येकाची तपासणी झाली तर तो पुढे "कोरोना'चा संसर्ग होणार नाही.

coronavirus एसटी, रेल्वेस्थानकावर तपासणी नाहीच 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जगभरात "कोरोनो'बाबत दक्षता घेतली जात आहे. मात्र, जळगाव रेल्वेस्थानकासह बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कक्षच नाही. यामुळे संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर तपासणी कक्ष सुरू करण्याची गरज आहे. जर याठिकाणी आलेल्या प्रत्येकाची तपासणी झाली तर तो पुढे "कोरोना'चा संसर्ग होणार नाही. 

क्‍लिक करा -coronavirus ट्रॅव्हल्समधील साडेतीनशेवर प्रवाशांची तपासणी 


पंतप्रधानानांनी रविवारी "पब्लिक कर्फ्यू'ची घोषणा केली आहे. रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांसाठी वेगळा कक्षही स्थापन झाला आहे. "कोरोनो'चा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, जीम, तरणतलाव बंद आहे. अत्यावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू आहे. मात्र, मॉल बंद आहेत. कोणालाही कोरोनो होऊ नये म्हणून या सर्व गोष्टींवर बंदी आली आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक नागरिक पुणे, मुंबई, इतर ठिकाणीवरून येतात. या येणाऱ्या प्रवाशांची जर संबंधित रेल्वेस्थानकावरच त्याला कोरोनो वा अन्य आजाराची लागण झाली आहे का? याची तपासणी झाली आहे का हे तपासले तर त्याच ठिकाणी त्यावर उपचारासाठी ताब्यात घेतले जाईल. जर तपासणी नाही झाली तर तो घरी जाईल, अथवा ज्यांना ज्यांना भेटेल त्यांना संसर्गाचा धोका आहे. यामुळे रेल्वेस्थानके, बस स्थानकांवरच तपासणी होणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटते. 

मोजकेच कर्मचारी कार्यरत 
शासनाने पन्नास टक्केच कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले आहे, त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांनी आजपासूनच केली आहे. ज्यांना रोज अत्यावश्‍यक कामे करावे लागतात त्यांनाच कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. इतरांनी घरी बसावे, जेव्हा बोलावणे येईल तेव्हाच यावे, सांगितले आहे. यामुळे आज शासकीय कार्यालयात कर्मचारी अत्यल्प प्रमाणात आलेले दिसले. 

मास्क लावून कामकाज 
"कोरोनो'चा संसर्ग होऊ नये, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी मास्क घालून कामावर आज आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी फारशी नव्हती, मात्र, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ज्याही व्यक्ती आलेल्या त्यांच्याशी मास्क लावूनच बोलणे पसंत केले