जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत खेळाडू पॅनलचा दणदणीत विजय 

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत खेळाडू पॅनलचा दणदणीत विजय 


नाशिक : प्रतिष्ठेच्या बहुचर्चित जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणूकीत खेळाडू पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडविला. परिवर्तव पॅनलच्या विरोधकांना एकही जागेवर स्थान मिळविता आले नाही. 18 पैकी निवड समिती सदस्यां तीन जागांवर यापूर्वीच शेखर गवळी,तरूण गुप्ता व सतिश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली होती. आज पंधरा जागांसाठी निवडणूकीत "खेळाडू'पॅनलने एकहाती सत्ता खेचण्यात शहा यांना यश आले असेच म्हणता येईल. 

न्यायालयीन प्रक्रियेमुळे गाजलेल्या ही निवडणूक घेण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने अगोदरच सत्तारूढ खेळाडू पॅनलच्या बाजूने निकाल लागल्याचे मानले जात होते. त्यानुसार आज सकाळी तुपसाखरे लॉन्सच्या ठिकाणी मतदानाला सुरवात झाली. 47 क्‍लब, संघटना संलग्न असलेल्या जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे एकूण दोन हजार 489 मतदार आहेत. त्यापैकी सायंकाळी पाचपर्यत एक हजार 455 सभासदांनी मतदान केले. व्होटींग मशिनचा वापर केल्याने निकालही लवकर लागेल. याची सर्वांनाच अपेक्षा होती.

पाचला मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी सुरु झाली. अवघ्या तासाभरात निकाल हाती आले. पहिल्यापासूनच खेळाडूं पॅनलच्या उमेदवारांनी वर्चस्व राखले. या पॅनलच्या उमेदवारांना एक हजारांच्या पुढेच मते मिळाली. तर पराभूत पॅनलचे उमेदवार हे अडीचशे तीनशेच्या आसपास राहिले.. सायंकाळी सव्वासहाला अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर खेळाडू पॅनलच्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळत आणि ढोलताशांच्या गजरात या उमेदवारांनी आनंद भावना व्यक्त केली. 


निकाल असाः (कंसात मिळालेली मते) 
चेअरमन- धनपाल शहा(1,233),सचिव-समीर रकटे(1228),खजिनदार-हेमंत देशपांडे(1161),सहसचिव-योगेश हिरे(1251),आनंद शेट्टी(1109),कार्यकारीणी समिती सदस्य-डॉ.अनिरूध्द भांडारकर(1302),विनायक रानडे(1252),श्रीपाद दाबक(1250),चंद्रशेखर दंदणे(1248),निखील टिपरी(1242),रूऊफ पटेल(1238), रघुवेंद्र जोशी(1228),शिवाजी उगले(1226),संजय परीडा(1206),जगन्नाथ पिंपळे(1189), निवड समिती सदस्य(बिनविरोध)- शेखर गवळी,तरूण गुप्ता,सतीश गायकवाड 

जागरूक सभासदांनी दिली कामाची पावती 
या निवडणूकीनंतर "सकाळ'शी बोलतांना धनपाल( विनोद) शहा म्हणाले,राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना वेगवेगळी संधी कशी मिळेल, तसेच अद्यावत सुविधा कशा देता येतील, याला मी प्राधान्य दिले आहे. नियोजनबध्द कामास आम्ही नेहमीच प्राधान्य दिले असून पुढील काळातही अद्यावत सुविधा,खेळाडूंना वेगवेगळ्या सामन्यात संधी, सामन्याचे आयोजन यासारखे काम सुरुच ठेवणार आहे. गेल्या तीन चार वर्षात केलेल्या कामांची पावती सभासदांनी आमचा संपूर्ण पॅनल निवडून आम्हाला दिली. सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या या विश्‍वासास कधीही तडा जाऊ देणार नाही. चांगले काम करम्यास आम्ही सर्वजण प्राधान्य देऊ,अशा शब्द मी देतो,असे ते म्हणाले, 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com