सातपूरमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला,कोयता, तलवारीने वार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नाशिक : सातपूरच्या गणेशनगरमध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्यासाठी संगनमताने तक्रारदारास नेले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यास वाचविण्यासाठी आलेल्या दोघांवरही संशयितांनी कोयता, तलवारीने वार करत जखमी केले आहे. याप्रकरणी चार-पाच जणांविरुद्ध सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

विरेंद्र यशपाल शर्मा (रा. पत्रा गल्ली, भारतनगर, मुंबई नाका) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आकाश फलके, अजय बनसोडे, करण नरेश धुळे (तिघे रा. गणपती मंदिराजवळ, गणेशनगर, सातपूर) व आणखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विरेंद्र शर्मा यांचा साला अर्जून भगीरथ खरादे याने संशयितांविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यासंदर्भात संशयितांनी सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अर्जुन खरादे यास सदरचे प्रकरण आपसात मिटवून तक्रार मागे घेण्यासाठी गणेशनगरच्या पेट्रोल पंपानजिकच्या उद्यानात नेले. त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या खोलीजवळ संशयितांनी त्यांच्याकडील कोयता आणि तलवारीने अर्जुन खरादे याच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 विरेंद्र शर्मा व त्याचा मित्र दीपक हे त्यास वाचविण्यासाठी मदतीला धावले. परंतु संशयितांनी त्यांच्यावरही कोयता व तलवारीने वार करून दुखापत केली. तसेच, दीपक याच्या दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केले. जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सातपूर पोलिसात दाखल करण्यात आला असून संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. 
 
Web Title: marathi news crime