गंगापूर पोलीस ठाण्यात संशयिताने घेतले डोके फोडून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

नाशिक : प्राणघातक हल्ल्यातील संशयिताला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई सुरू असताना, संशयिताने पोलीस ठाण्यामध्ये भिंतीवर डोके आपटून फोडून घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांशी चौकशीदरम्यान हुज्जत घातल्याने याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लक्ष्मण खरात (38, रा. संत कबीरनगर, भोसला स्कुलच्या मागे, कॉलेजरोड) असे संशयिताचे नाव आहे. संजय खरात याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असून त्यास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने पोलीसांनी अर्वाच्य शिवीगाळ करीत, भिंतीवर डोके आपटून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : प्राणघातक हल्ल्यातील संशयिताला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई सुरू असताना, संशयिताने पोलीस ठाण्यामध्ये भिंतीवर डोके आपटून फोडून घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांशी चौकशीदरम्यान हुज्जत घातल्याने याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लक्ष्मण खरात (38, रा. संत कबीरनगर, भोसला स्कुलच्या मागे, कॉलेजरोड) असे संशयिताचे नाव आहे. संजय खरात याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असून त्यास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने पोलीसांनी अर्वाच्य शिवीगाळ करीत, भिंतीवर डोके आपटून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: marathi news crime