रिक्षाचालकाकडून पुन्हा युवतीचा विनयभंग,धावत्या रिक्षातून पीडितेने घेतली उडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून बाहेर उडी घेतली. याप्रकरणी संशयित रिक्षाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रवी शंकर गोफणे (22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेलमागे, गरवारे पॉईन्ट, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ती काल (ता.19) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयिताच्या रिक्षातून प्रवास करीत होती. त्यावेळी रिक्षा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल आंगणसमोर आली असता, संशयिताने पीडित युवतीचा हात पकडला आणि "तू मुझे अच्छी लागती है' असे म्हणून तिचा विनयभंग केला. त्यावेळी पीडित युवतीने संशयिताला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र संशयिताने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरडा करण्याचाही प्रयत्न केला. परंतु तरीही संशयित रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे पीडित युवतीने धावत्या रिक्षातून बाहेर उडी घेतली. या घटनेमध्ये तिच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news crime