दिंडोरी तालुक्यात दोन धरणे कोरडीठाक,तीन धरणात पाच टक्केच पाणीसाठा

दिगंबर पाटोळे
शनिवार, 13 जुलै 2019

वणी :  दिंडोरी तालुक्यात असलेल्या सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने पालखेड धरण (२५ टक्के) वगळता दोन धरणे कोरडीठाक तर तीन धरणांमध्ये अवघा सरासरी पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान पेरण्यांसाठी रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने  पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे.

वणी :  दिंडोरी तालुक्यात असलेल्या सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने पालखेड धरण (२५ टक्के) वगळता दोन धरणे कोरडीठाक तर तीन धरणांमध्ये अवघा सरासरी पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान पेरण्यांसाठी रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने  पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे.

जुन महिन्यात तालुक्यात तुरळक स्वरुपात झालेला पाऊस वगळता संपूर्ण महिना कोरडाठाक गेला. गेल्या दहा बारा दिवसांत एक दोन    दिवस बऱ्यापैकी झालेला पाऊस व अधुनमधून रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने तालुक्यात पेरण्या सुरु झाल्या आहेत.  सोयाबीन, मका, उडीद, मुग यांच्यासह लाल कांदा, टॉमेटो, भात, भाजीपाल्याची बियाने पेरण्यात आली आहे. पावसाची रिमझीम व उघड झाप यामूळे पेरणी केलेल्या बियान्यांना योग्य वापसा मिळत असल्याने सोयाबिन, टॉमेटोची रोपे, कडधान्या यांची उगवन क्षमता चांगली असल्याचे खोरीफाटा येथील शेतकरी सम्राट राऊत यांनी सांगितले. तर भाताची रोपेही चांगल्या प्रकारे उतरली असून दहा बारा दिवसांत लागवडी योग्या पाऊस झाल्यास भाताची लावणी सुरु होणार असल्याचे पिंगळवाडी येथील पंडीत भरसट यांनी सांगितले आहे. पेरलेल्या पिकांतील अतर्गंत मशागतीची कामांची तसेच टॉमेटाे लागवडीसाठी ठिकठिकाणी प्लस्टिक पेपर टाकण्याचे कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
    ठरावीक काही भाग वगळता आतापर्यंत तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना थोडे फार प्रमाणात प्रवाहीत झाली अाहे. मात्र दुसरीकडे शेतातील विहीरीत अद्याप पाणी न उतरल्याने विहिरीचा तळ उघडाच असून तालुक्यातील धरणांचा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यातही अपेक्षीत वाढ झालेली नाही. तालुक्यातील ६९५.९० मिमि. वार्षिक सरासरी पर्जन्यमाना पैकी  १ जुन ते  १२ जुलै २०१९ अखेर २३३ मि.मी (३३.४८ टक्के) पाऊस झाला असून यात १ जुन ते ३० जून २०१९ अखेर तालुक्यात अवघा २६ मि.मी. पाऊस झाला आहे तर १ जुलै ते १२ जुलै या १२ दिवसांत २०७ मि. मी. पाऊसाची नोंद झाली आहे. 
    दुसरीकडे तालुक्यातील पूणेगाव व तिसगांव धरणे अद्याप पर्यंत कोरडीच असून पालखेड धरणात मे महिन्यात करंजवण धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामूळे धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे. मात्र बाकी धरणांमध्ये अवघा ३ ते ८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

तालुक्यातील १२ जुलै रोजीचा उपयुक्त जलसाठा द.ल.घ.फु व कंसात टक्केवारी पुढील प्रमाणे :  पालखेड १६१ (२५), करंजवण २७१ (५), वाघाड १९२ (८), आेझरखेड ५६ (३), पुणेगांव ० (०), तिसंगाव ० (०)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dam water problem