तुकाराम मुंढेना आणणारच,लवकरच जनहित याचिका-दमानिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नाशिक: महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लोकहिताची कामे करत जनतेचा विश्‍वास मिळविला होता. त्यांच्या तातडीच्या बदलीमुळे नाशिककर संतापलेले आहे. येथील लोकप्रतिनिधीचा दबावामुळे त्यांची बदली झाली असल्याने या सर्वांच्या नाकावर टिच्चून माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांना परत आणण्यासाठी आम्हाला साथ द्या, मुंडेच्या बदली विरोधात मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले. 

"मी नाशिककर' यांच्यावतीने तुकाराम मुंडे यांची बदली करण्यासाठी शहरातील गोल्फ कल्ब ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ते व नागरिकांकडून मुंडेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या मोर्चात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील सहभागी झाल्या होत्या. 

 दमानिया म्हणाल्या की, सर्व नाशिककरांना मुंडे हवे आहेत मात्र लोकप्रतिनिधींना ते नकोसे झाले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधीचा रोष आहे. मुंडे परत हवे आहे म्हणून नाशिकचे नागरीक त्यांच्या बदली विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी मी आले आहे. याकरीता पुढील चार दिवसांमध्येच प्रत्येक चौका-चौकात स्वाक्षरी मोहिम राबवून मुंडेंना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले. यावेळी "आप' चे जितेंद्र भावे, जगबिर सिंग, समाधान भारतीय, निशीकांत पगारे, योगेश कापसे, विश्‍वास वाघ, आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरकार आजित पवारांना वाचवतेय 
सिंचन घोटाळ्यात नाव आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासनाकडूनच वाचविले जात असल्याचा आरोप  दमानिया यांनी केला. शिवसेनेच्या खिशातले राजीनामे बाहेर आले तर त्यांना राष्ट्रवादीची मदत भाजपाला घ्यावी लागणार असल्याने हे सर्व काही घडत असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: marathi news damaniya agitation