धोकादायक वाड्यांचे होणार फेर स्थळनिरीक्षण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक : जुने नाशिक भागातील तांबट आळीमधील काळेवाडा पडल्यानंतर महापालिकेचा नगररचना विभाग प्रशासन खडबडून जागा झाला आहे. नगररचना विभागाने धोकादायक वाड्यांचे फेर स्थळनिरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय अधिकारी व नगररचना विभागातर्फे धोकादायक वाड्यांना पुन्हा नोटिसा बजावून वाड्यांचा धोकादायक भाग उतरविला जाणार आहे. 

पूर्व विभागात असलेल्या तांबट आळीमधील काळेवाडा रविवारी कोसळला. त्यात दोघांचा मृत्यू, तर तिघे जखमी झाल्याने हे प्रकरण महापालिकेच्या नगररचना विभागावर शेकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेने तत्काळ पावले उचलून धोकादायक वाड्यांचे फेर स्थळनिरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचवटी व पूर्व विभागात शहरात सर्वाधिक वाडे आहेत. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यत्वे या भागातील पडक्‍या, धोकादायक स्थितीतील वाड्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विभागीय अधिकारी, नगररचना विभागाच्या अभियंत्यामार्फत फेर स्थळनिरीक्षण होईल. 

वाडे वाढण्याची शक्‍यता 
महापालिकेने धोकादायक वाड्यांचे दहा वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्याच सर्वेक्षणाच्या आधारे दर वर्षी नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. नगररचना विभागाच्या दप्तरी 397 वाडे सद्यःस्थितीत दिसत आहेत. फेर स्थळनिरीक्षण केल्यानंतर वाड्यांमध्ये पुन्हा वाढ होणार आहे. त्याशिवाय धोकादायक घरांचेही निरीक्षण केले जाईल. 

भाडेकरूंची संख्या अधिक 
सध्या अस्तित्वात असलेल्या वाड्यांमध्ये भाडेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निवासस्थान असल्याने धोकादायक वाडे सोडण्यास कोणी तयार होत नाही. शहरात नऊशेहून अधिक वाडे आहेत. त्यातील पाचशेपेक्षा अधिक वाड्यांचे दावे न्यायालयात प्रलंबित असून, त्या वाड्यांमध्ये सुमारे बारा हजारांहून अधिक भाडेकरू कुटुंबाचा समावेश आहे

Web Title: marathi news dangerous house and wada in nashik

टॅग्स