#MahaEducation राज्यात डीएडच्या ५३ हजार जागा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिकः डीएडचा एकेकाळी अर्ज मिळणे हे दिव्यच होते. अर्जासाठी संघर्ष, तो भरून दाखल करण्यासाठी कसरत करावी लागत होती. एवढे करूनही प्रवेश मिळतो की नाही याची धास्ती कायम असायची. अशी अध्यापक शिक्षण पदविका अर्थात डी.एड. अभ्यासक्रमाची स्थिती होती.

   गेल्या तीन-चार वर्षांत मात्र शिक्षक घडविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती आहे. राज्यात डी.एड विद्यालयांमधील सुमारे 53 हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी प्राप्त अर्जांची संख्या केवळ चौदा हजार इतकी आहे. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी जरी प्रवेश घेतला तरी डी.एड. अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील 40 हजार जागा रिक्त रहाण्याची स्थिती आहे. या अभ्यासक्रमाची अशी स्थिती का झाली, याची विचारमिमांसा करण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ded situation