"मोदी, फडणवीसांना समजून सांग, कोंडून ठेवलाय आमचा वाघ"

संजीव निकम
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नांदगाव : "पाण्यालाही लावू आग, सोडवू समतेचा वाघ, कटकारस्थाने करून कोंडून ठेवलाय आमचा आर्मस्ट्रॉंग !"अशा प्रकारची उस्फुर्त गीते म्हणत भुजबळ अनुयायांनी आज येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारावर धडक देत आसमंतात घुमणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

नांदगाव : "पाण्यालाही लावू आग, सोडवू समतेचा वाघ, कटकारस्थाने करून कोंडून ठेवलाय आमचा आर्मस्ट्रॉंग !"अशा प्रकारची उस्फुर्त गीते म्हणत भुजबळ अनुयायांनी आज येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारावर धडक देत आसमंतात घुमणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

केवळ भुजबळ परिवारावर सूड उगवायचा म्हणून सूडबुद्धीने व आकस ठेवून अशा प्रकारची कारवाई होत असल्याचा संदेश देशभरातील भुजबळ समर्थकांत पोहचत असल्याने त्याच्या उद्रेकाची सुरुवात या निर्दशनातून झाली. न्यायाच्या नावाखाली हा तर अन्याय असल्याचा सूर उठवीत भुजबळांची सुटका झाली पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करीत याबाबतचे निवेदन शासनाला देण्यात आले ही सुरुवात असून यापेक्षा अधिक तीव्रतेने आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला तालुक्यासह नांदगाव विधानसभा मतदार संघातील स्थापन करण्यात आलेल्या भुजबळ समर्थक समन्वय समितीच्या वतीने आज सकाळी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निर्दशने करण्यात आली आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांची निर्दशनवजा आंदोलन असल्याने पोलिसांनी प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

औरंगाबाद रस्त्यावरील तहसिलकडे कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या वरद व्यापारी संकुलाबाहेर सकाळी दहापासूनच भुजबळ अनुयायांची वाहने यायला सुरुवात झाली अकरा वाजता प्रमुख नेते पदाधिकारी आल्यावर वरद संकुलापासून ते थेट नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलापर्यंत घोषणा देत, मी भुजबळ लिहलेले पिवळे ध्वज हातात घेऊन उंच फडकावीत डोक्यावर टोप्या घातलेले तर काहींनी भुजबळांच्या प्रतिमा उंचावित मोर्चा काढला पोलिसांनी तो अडविला त्यांनतर माजी आमदार अनिल आहेर, जेष्ठ नेते साहेबराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, रईसभाई फारुकी विठ्ठल नलावडे, यांची यावेळी भाषणे झालीत न्याय देणाऱ्या न्याय व्यवस्थेला चुकीच्या पद्धतीने अहवाल देणारी यंत्रणा सध्या कार्यान्वित आहे की काय याचा संशय भुजबळ प्रकरणातून यावा अशी स्थिती आहे असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी केला कायद्याचा सन्मान राखलं पाहिजे मात्र कायद्याचीच चिकित्सा करण्याची वेळ येऊन ठेपल्याची खंत माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या उस्फुर्त गीताने वातावरणातला नूरच पालटला त्यांनी रा. स्व. संघाची खिल्ली उडवीत काळी टोपी हाफ चड्डी मोदी फडणवीसला समजून सांग कोंडून ठेवलाय आमचा वाघ या गीताने निदर्शकांचा उत्साह टिपेला पोहचला व टाळ्यांच्या कडकडाट गुप्तांच्या गीताला दाद देण्यात आली काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार अनिल आहेर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, मनमाडचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष रमेश पगार माजी नगराध्यक्ष बालकाका कलंत्री, शिवाजीराव पाटील, अरुण पाटील, गिरणनगरचे सरपंच शिवाजी कवडे, डॉक्टर प्रभाकर पवार विजय पाटील बबलू पाटील डॉक्टर वाय. पी. जाधव, श्रावण आढाव, पापा थॉमस, अर्पण देशमुख आदींसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 

Web Title: Marathi news demand for relieve chagan bhujbal by his supporters