डेंगीस कारणीभूत ठरणाऱ्या घरमालकास पाचशे रूपये दंड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक- डेंगी डासांच्या उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासंदर्भात महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही बहुतांश घरांमध्ये अजूनही डेंगी डासांच्या अळी आढळतं आहे. त्यामुळे आता महापालिकेने डेंगी आजाराला कारणीभुत ठरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या घरांमध्ये डेंगीच्या अळी आढळतील, अशा घरमालकांना पाचशे रुपये दंड आकारला जाईल. स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर तातडीने अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. शहरात गेल्या काही वर्षात डेंगी रुग्णांची संख्या वाढतं असल्याने महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे.

जनजागृती करताना पालिकेने शोध मोहिम उघडली त्यात डेंगू आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांची अळी प्रामुख्याने घरांमध्ये ठेवलेले ड्रम, टाकी, रांजन, माठ, कुलर, फ्रील मागील ट्रे, हौद, फुलदाणी, झाडाच्या कुंड्या, टायर्स, भंगार वस्तु, घराचे छत, बाल्कनी आदी भागात आढळून आल्या आहेत. वांरवार सुचना देवूनही काही नागरिकांकडून उपाययोजना होत नाही त्यामुळे पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. घराच्या आतील भाग, घर परिसरातील पाणी साठ्याचे यग्य काळजी न घेणाऱ्या व त्यामध्ये डेंगु डासाची उत्पत्ती आढळल्यास अशा नागरिक व संस्थांना प्रति डा उत्पत्ती स्थानासाठी पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. 
 
Web Title: marathi news denuge home holder