esakal | धुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी शोध मोहिम !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी शोध मोहिम !

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आगामी दिवसांत हे प्रमाण वाढू नये. सातत्याने बहुतांश शासकीय, निमशासकीय कर्मचारी आपली सेवा बजावत आहे.

धुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी शोध मोहिम !

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.सतर्कताच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात विविध विभागात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येत आहे. आगामी दिवसांत संबंधित कर्मचारी सुपर स्प्रेडर ठरू नये. लक्षणे विरहीत दिसणारे कर्मचारींचा शोध घेऊन वेळेवर प्रतिबंध उपाययोजना करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाचे आहे. गेल्या आठ दिवसांत पाच हजारांवर शासकीय कर्मचारींची स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. 

वाचा- प्रकाशापासून दूर असलेल्या झोपड्या युवकांनी दिवा लावून उजाळल्या !

उर्वरित दिवसांत शासकीय कर्मचारी नंतर निमशासकीय कर्मचारींची आरटिपीसीआर टेस्ट टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय प्रत्येक अधिकारी, कर्मचारीला कोविड19 तपासणी आवश्यक आहे. संबंधित कर्मचार्यांनी स्वतःहून तपासणी करावी. असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जे शासकीय, निमशासकीय कर्मचारी स्वॅब देणार नाहीत. त्यांच्या वेतनावर गदा येऊ शकते. अशी चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुकास्तरावर तपासणी सुरू आहेत. 

यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षक, पोलिस दल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, राज्य राखीव दल, तलाठी, ग्रामसेवक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, आश्रमशाळांचे कर्मचारी,आदि सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आगामी दिवसांत हे प्रमाण वाढू नये. सातत्याने बहुतांश शासकीय, निमशासकीय कर्मचारी आपली सेवा बजावत आहे.
 

 " कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क, सॅनिटेशन, हॅण्डहायजिंग त्रिसूत्रीचा वापर करावा. चाचणीसाठी घाबरू नये. दिवाळी सुखरूप व्हावी. पुढील धोका टळावा. हा उद्देश आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व कर्मचारींची तपासणी होईल."

- डाॅ. विशाल पाटील: कोरोना नोडल अधिकारी धुळे जिल्हा.