esakal | आता..एसएमएसने पाठवा वीजमीटरचे रीडिंग

बोलून बातमी शोधा

null
आता..एसएमएसने पाठवा वीजमीटरचे रीडिंग
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : वीज महावितरण कंपनीने मोबाईल अ‍ॅप व वेबसाइटद्वारे वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविण्याची सोय केली आहे. यात आता मोबाईल ‘एसएमएस’ द्वारेही मीटर रीडिंग पाठविण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा: आमदार कुणाल पाटलांना ‘मार्केटिंग’ची गरज नाही !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन सुरू आहे. यात अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहेत. अशा ठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मीटर रीडिंग घेता येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे मीटर रीडिंग पाठवण्याची सोय केली आहे. ती कायम ठेवत महावितरण कंपनीने मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही ग्राहकांना मीटर रीडिंग पाठवण्याची सोय केली आहे. स्मार्टफोन नसलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविता येईल. त्यासाठी संबंधित ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत असेल.

हेही वाचा: महामार्ग चौपदरीकरणाचे कोरोनामुळे यंत्रणा ‘लॉक’, काम ‘डाउन’ !

कंपनीकडून प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येते. मीटर क्रमाकांसह दरमहा रीडिंगसाठी निश्चित तारीख वीजबिलावर नमूद असते. अशा निश्चित तारखेच्या एक दिवस अगोदर महावितरण कंपनीकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून ‘एसएमएस’द्वारे रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. तसा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल. या चार दिवसांमध्ये आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवता येईल. ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठवण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवणे आवश्यक आहे. याबाबत दरमहा केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी ग्राहकाला लागेल. त्यामुळे वीज वापरावरही नियंत्रण राहील. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास तत्काळ तक्रार करावी. मीटर रीडिंग वाढल्यास कारणे शोधता येतील. शंकेचे निरसन करता येईल, असे महावितरणने सांगितले.

हेही वाचा: राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर

...असा करावा एसएमएस

वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस> असा ‘एसएमएस’ ९९३०३ ९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. बाराअंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रीडिंग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारले जाणार नाही. ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन स्थितीमध्ये उपलब्ध असेल.

संपादन- भूषण श्रीखंडे