esakal | 35 कि.मी.चा पायी प्रवास... 32 उसतोड कामगार "होम क्वारंटाइन' 
sakal

बोलून बातमी शोधा

quarantine

झाकरायाबारीतून ते 35 किलोमीटर पायी आले. त्यानंतर त्यांची नोंदणी केली असून, पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला आहे. 

35 कि.मी.चा पायी प्रवास... 32 उसतोड कामगार "होम क्वारंटाइन' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : "लॉकडाउन'मुळे जिल्हा व सीमाबंदी केली आहे. गुजरातेतून 32 ऊसतोड कामगारांना मढी साखर कारखाना प्रशासनाने झाकरायाबारी घाटात ट्रकने बेवारस सोडून दिले. हे कामगार येथील लोणेश्वरी-भिलाटीतील रहिवासी आहेत. झाकरायाबारीतून ते 35 किलोमीटर पायी आले. त्यानंतर त्यांची नोंदणी केली असून, पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला आहे. 

हेपण वाचा - धक्कादायक : धुळे जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त; साक्रीतील एकाचा मृत्यू

साक्री तालुक्‍यात कामगारांना उद्योगधंदे नसल्यामुळे तेथील कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात जातात. यंदाही हे कामगार ऊसतोडणीसाठी गुजरातला गेले होते. "कोरोना'मुळे काम बंद झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. या कामगारांना कारखान्यातून मजुरीचे पैसेही दिले नाहीत. अन्नधान्यही दिले नाही. उलट एका ट्रकने धुळे जिल्ह्याच्या सीमालगत झाकरायाबारीत सोडून दिले. "कोरोना'च्या भीतीमुळे ग्रामस्थांनी त्या कामगारांना गावात प्रवेश दिला नाही. गावाबाहेर थांबवून त्यांची नोंद केली. त्यानंतर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला व त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला. 
जिल्हाबंदी असतानाही गुजरात राज्यातून त्या कामगारांना महाराष्ट्राच्या सीमालगत सोडले कसे? त्यांना पोलिसांनी अडविले का नाही? 35 किलोमीटर अंतर ते कामगार पायी चालत आले. तरीही त्याची दखल प्रशासनाने का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सर्व कामगारांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला आहे. मात्र या कामगारांजवळ पोटाची खळगी भरण्यासाठी पैसा नाही, त्यामुळे 14 दिवस घरात कसे बसायचे? असा प्रश्न त्या कामगारांपुढे आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी त्या कामगारांना आर्थिक मदत करावी. असे मत व्यक्त होत आहे

loading image