esakal | विश्व आदिवासी दिनाचे औचित्‍य; ऑनलाइन वैचारिक प्रबोधन
sakal

बोलून बातमी शोधा

birsa munda

आदिवासी शिक्षणसेवा प्रतिष्ठानतर्फे ९ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनानिमित्त ऑनलाइन वैचारिक प्रबोधन आणि विविध कला स्पर्धा सप्ताह होणार आहे.

विश्व आदिवासी दिनाचे औचित्‍य; ऑनलाइन वैचारिक प्रबोधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

छडवेल कोर्डे (धुळे) ः आदिवासी शिक्षणसेवा प्रतिष्ठानतर्फे ९ ऑगस्टला विश्व आदिवासी दिनानिमित्त ऑनलाइन वैचारिक प्रबोधन आणि विविध कला स्पर्धा सप्ताह होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते १ ऑगस्टला होणार आहे. 

‘घे भरारी आदिवासी नारी’ या विषयावर जळगाव जिल्‍ह्याचे उपजिल्‍हाधिकारी दीपमाला चौरे, डॉ. मीनाक्षी जगताप, रंजना बागूल, प्रा. कल्पना बागूल हे १ ऑगस्‍टला मार्गदर्शन करणार आहेत. तर नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी, साक्री पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, वर्षा अहिरे (एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर) प्रमुख पाहुणे असतील. 
२ ऑगस्टला ‘आदिवासी संस्कृती’ या विषयावर प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील मार्गदर्शन करतील. छडवेल कोर्डे आदिवासी शिक्षणसेवा प्रतिष्ठानचे समन्वयक प्रभाकर पवार अध्यक्षस्थानी असतील. ३ ऑगस्टला ‘आदिवासी अध्ययन-बदलते दृष्टिकोन’ यावर डॉ. पद्माकर सहारे आणि ‘आरोग्य’ या विषयावर डॉ. चेतन पवार मार्गदर्शन करणार आहेत. आदिवासी शिक्षणसेवा प्रतिष्ठानचे समन्वयक मंगलदास अहिरे अध्यक्षस्‍थानी आहेत. ६ ऑगस्टला विद्यार्थी आणि युवावर्ग कलावंत यांच्यासाठी ‘ऑनलाइन गीतगायन आणि वादन’ स्पर्धा होईल. कवी आणि गायक रमेश भोये अध्यक्षस्‍थानी असतील. ७ ऑगस्टला वक्तृत्व स्‍पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अनेक विद्यार्थी आणि युवा सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राम असणार आहेत. ८ ऑगस्टला ‘संघटनकौशल्ये’ या विषयावर प्रा. राहुल गायकवाड मार्गदर्शन करणार असून, प्राचार्य अशोक बागूल अध्यक्षस्थानी असतील. ९ ऑगस्टला ‘वैचारिक सहसंवाद’ कार्यक्रमात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी जिल्‍हा परिषद सदस्य तुळशीराम गावित मार्गदर्शन करणार असून, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विभागीय उपायुक्त यशवंत पवार अध्यक्षस्थानी असतील. ऑनलाइन वैचारिक प्रबोधन आणि विविध कला स्पर्धेत जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन केले आहे. 

loading image