esakal | ना ब्राह्मण, ना घेतली दमडी; असा एक विवाह शिवजयंतीला
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

म्‍हणतात ना की विवाह एकदाच होतो. म्‍हणून साखरपुडा असो की लग्‍न अगदी धुमधडाक्‍यातच हवे असते; आणि तसे केलेही जाते. पण कोरोनाने या धुमधडाक्‍यावर अंकूश लावला आहे. तरी हौस पुर्ण करण्यासाठी काही जण बाहेर साधा वाटणारा पण धुमधडाक्‍यातील विवाह करत असतात. पण याला अपवाद ठरलाय पिंपळनेर येथील एक होणारा आदर्श विवाह. ना ब्राह्मणाची साक्ष आणि ना घेतली एक रूपयाची देखील दमडी. 

ना ब्राह्मण, ना घेतली दमडी; असा एक विवाह शिवजयंतीला

sakal_logo
By
भरत बागूल

पिंपळनेर (धुळे) : माळी समाजात हा आदर्श विवाह जुळला. सत्यशोधक पद्धतीने हूंडा न घेता ब्राम्हणाशिवाय झाला साखरपुडा, सत्यशोधक पद्धतीने होणार लग्न, शिवजयंतीला विवाह होणार आहे. पिंपळनेर येथील माळी समाजातील उच्चशिक्षित इंजिनीयर महेश पंडित पगारे याने कोणताही हुंडा न घेता नाशिक येथील एमकॉम झालेली पूजा रवींद्र अहिरे हिच्याशी सत्यशोधकपद्धतीने ब्रम्हणाशिवाय साखरपुडा केला.

पिंपळनेर येथील चिरंजीव महेश हा सुनंदा व पंडित नाना पगारे राहणार ब्राह्मणगाव (ता. सटाणा, हल्ली मुक्काम पिंपळनेर) यांचा मुलगा असून तो एमसीए होऊन पुणे येथे नोकरी करतो. त्याचा विवाह निश्चिती कुमारीपूजा एमकॉम सुनीता व रविंद्र सोनू अहिरे (रा. धुळे हल्ली मुक्काम नाशिक) हिच्याशी निश्‍चित झाला.

पाहिले, ठरले आणि लगेच साखरपुडा
नाशिक येथे गेलो असता पसंतीनंतर विवाह हा सत्यशोधक पद्धतीने व हुंडा न घेता करण्याचे महेशने सांगितले. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यवाह व अखिल भारतीय माळी समाज फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष सुभाष जगताप व महेशचे वडील पंडित पगारे, काका बाळू पगारे, भाऊ राहुल पगारे, मामा राजेंद्र निकम यांनी संमती दिली. त्याला पूजा तिचे वडील रविंद्र अहिरे, आई सुनीता अहिरे, मुलीचे काका पांडुरंग अहिरे, तुकाराम आहिरे, किसन आहिरे, भाऊ उमेश आहिरे, दीपक आहिरे व मामा भिकन माळी यांनी देखील संमती देत होकार दिला.
लगेच त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन चिरंजीव महेश व कुमारीपूजा यांनी करून पुष्पहार अर्पण केले. तसेच मुलाचे व मुलीचे आई- वडिलांनी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केले व चिरंजीव महेश व पूजा यांनी एकमेकांना गुलाब पुष्प देऊन जीवनसाथी राहण्याचे वचन दिले व अंगठी घालून साखरपुडा ब्राह्मणाशिवाय संपन्न झाला.

शिवजयंतीचा साधला मुहूर्त
साखरपुड्याप्रमाणे लग्‍न करण्याचे देखील निश्‍चित करत लग्‍नाची तारीख काढण्यात आल. सत्‍यशोधक पद्धतीने विवाह सोहळा लावण्यासाठी महेश व पुजा यांचा विवाह पिंपळनेर येथे सत्यशोधक पद्धतीने रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीला 19 फेब्रुवारीला साध्या पद्धतीने करणार आहे. महेश याने हुंडा न घेता व मुलाकडे सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याच्या निर्णयाचे माळी समाजातून कौतुक होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे