पडळकर म्हणजे नवी नवरी...नवरी रुळल्यावर कळणार भाजपातील आनंद 

पडळकर म्हणजे नवी नवरी...नवरी रुळल्यावर कळणार भाजपातील आनंद 

धुळे : देवेंद्र फडणवीस हे धोकेबाज असून ते विश्वासघाती आहे. माझ्याशी केलेली धोकेबाजी सर्वत्र जगजाहीर आहे, पण मी संतापामध्ये मी कधी फडणवीस "महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असं म्हणणार नाही. ते किती धोकेबाज आहे मी जाणून आहे. पडळकर म्हणजे नवी नवरी आहे, नवरी रुळल्यावर घरात काय घडते हे जेवे समजेल तेव्हा शुध्दीवर येतील असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केलं एक पत्रक जारी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनिल गोटे यांनी 

एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थाने, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे त्यांनी केलेले उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात "मुसलमान आला तरी चालेल, पण अनिल गोटे येता कामा नये' यासाठी पैशांचा महापूर आला होता. ही वस्तुस्थिती असली तरी तसे मी "फडणवीस महाराष्ट्राला लागलेले महारोग आहे' असे मी कधी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. 

शकुनी मामा देखील झक मारेल 
गोटेंनी पत्रकात नमूद केले आहे की, मुनवादी मनोवृत्तीचा मी प्रत्यक्ष बळी असून कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे फडणवीस आहे. ते हलक्‍या कानाचे कारस्थानी आहेत की, शकुनी मामा देखील झक मारेल. प्रारंभीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध कारस्थान यांनीच रचले. खडसे दाऊदच्या बायकोसोबत फोनवर बोलतात इथपासून सुरु झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले. नाथाभाऊंची चूक एवढीच की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते, असा आरोप देखील त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. 

आठ दिवसात पडळकरांना नशा चढली 
भाजप आणि पक्षातील उच्चवर्णियांच्या कारस्थानाची पुसटशी ओळखही पडळकरांना नाही. आमदार होऊन आठ दिवस झालेत, तोवर पडळकरांना नशा चढली आहे. मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. गेली 10 महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषता. शरद पवारांवर प्रेम करणारांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे त्यापेक्षा दुप्पट लोक अन्य पक्षातील आहेत. 

पडळकर हे डासा ऐवढी नाही 
पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली. यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाची क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन्‌ राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. त्याला हीटचा फवारा पुरेसा असतो, असं गोटे यांनी म्हटलं 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com