esakal | बांबुर्लेच्या या युवकाने मिळविला भारतीय सैन्य दलात पहिला मान 
sakal

बोलून बातमी शोधा

indian aarmy

गावातील पहिलाच युवक भारतीय सैन्यदलात नोकरीला लागल्याने ग्रामस्थांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली. गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. 

बांबुर्लेच्या या युवकाने मिळविला भारतीय सैन्य दलात पहिला मान 

sakal_logo
By
तुषार देवरे

बांबुर्ले (ता.धुळे) : गावात सैन्यदलात आतापर्यंत कोणाचीही निवड झालेली नव्हती. यामुळे साऱ्या गावाला सैन्यदलात भरती होण्याचा आकर्षण होते. सैन्यदलात भरती होण्याचा मान सुपुत्र प्रविण हालोर याची भारतीय सैन्यदलात निवड होण्याचा मान मिळविला. गावातील पहिलाच युवक ज्याची सैन्यदलात निवड झाल्याने गावात जल्लोष करण्यात आला. 

हेही पहा - वेश्‍या व्यवसायातून तिला बाहेर काढून लग्नाचा केला बनाव; पुन्हा लोटले त्या खाईत 


बांबुर्ले (ता.धुळे) येथील सुपुत्र प्रविण अर्जुन हालोरने जिद्द चिकाटी मेहनत व शिक्षणाच्या जोरावर भारतीय सैन्य दलात दाखल झाला. आजपर्यंत इतिहासात सैन्यदलात नोकरीत दाखल होणारा प्रविण हालोर पहिलाच युवक आहे. गावातील पहिलाच युवक भारतीय सैन्यदलात नोकरीला लागल्याने ग्रामस्थांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली. गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. 
प्रवीण इंडियन आर्मीमध्ये दाखल झाल्याची बातमी जेव्हा प्रविणच्या कुटबांला समजली. तेव्हा आई वडिलांना, भावाला आनंद अश्रू अनावर झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. 

गावातून मिरवणुक 
गावातील सुपुत्र सैन्यदलात भरती झाल्याने गावात प्रविणची डीजेच्या तालावर घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी त्याचे औक्षण करून आनंदोत्सव साजरा केला. भारतमातेच्या जय घोषाने परिसर दणाणून सोडला. गावातील समाज बांधवांनी प्रविणचा नागरी सत्कार केला. नेरचे सरपंच शंकरराव हिरामण खलाणे यांनी नेर ग्रामपंचायतीतर्फे बांबुर्ले येथे जाऊन सन्मान केला. डॉ. सतिष बोढरे, नवल पाटील, जगन पाटील, भगवान पाटील, शंकरदास भैरागी, फिरोज पिंजारी, मधुकर माळी, पोलीस पाटील राजाराम पाटील, प्रताप पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते. 
 

loading image