बॉम्बच्या अवफेवे पळविली कारागृहातील यंत्रणा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

धुळे ः शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा कारागृहात दोन- तीन बॉम्ब असल्याची माहिती आज दुपारी नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिस विभाग हादरला. शहर पोलिसांसह बॉम्ब शोधपथक व श्‍वानपथकाद्वारे कारागृहात तत्काळ तपासणी करण्यात आली. मात्र, बॉम्ब असल्याची केवळ अफवाच निघाली. कारागृहात कुठलीही संशयास्पद वस्तू मिळाली नसली, तरी कारागृहाच्या आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षातून धुळे नियंत्रण कक्षाला कारागृहात दोन ते तीन बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षाने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांना कळविले. श्री. चौधरी यांच्यासह चार ते पाच अधिकारी, कर्मचारी बॉम्ब शोधपथक व श्‍वानपथकासह जिल्हा कारागृहात दाखल झाले. त्यांनी याबाबत कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना माहिती दिली. त्यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कारागृहात पाहणीस सुरवात केली. श्‍वानपथक व बॉम्ब शोधपथकानेही कारागृहात विविध ठिकाण तपासणी केली. कारागृहासह बाहेरच्या परिसरात पाहणी केली. परंतु कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सुरक्षितता म्हणून कारागृहाच्या आवारात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बॉम्ब असल्याची माहिती देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळाला असून, त्याची माहिती घेण्यात येत आहे. कारागृहात बॉम्बच्या अफवेने काही काळ अनेकांमध्ये भीती पसरली. पोलिसांनी वेळीच धाव घेत तपासणी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

Web Title: marathi news dhule bomb jail sistim