संचारबंदी मोडताय ना, मग कारवाईला सामोरे जा

विजय शिंदे
Saturday, 16 May 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीत 17 मेस मध्यरात्री बारापर्यंत संपूर्ण लॉकडाउन (संचारबंदी) घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याची काही नागरिकांकडून तक्रारी झाली आहे.

धुळे : शहरातील पाटबाजारासह विविध भागात "लॉक डाउन', संचारबंदी आहे की नाही, असा प्रश्‍न पडावा. अनेक नागरिक अकारण गर्दी करत आहेत. रिकामटेकडे वाहनांनी हिंडत आहेत. त्यामुळे संचारबंदी अशा नागरिकांनी नाकारल्याचे, गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे. ते प्रशासनाच्या लक्षात आल्याने संचारबंदीचे उल्लंघन करून फिरणाऱ्या व्यक्ती, संघटनांविरोधात नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.

क्‍लिक करा - वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी घेतले चक्क ५० रूपये 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीत 17 मेस मध्यरात्री बारापर्यंत संपूर्ण लॉकडाउन (संचारबंदी) घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याची काही नागरिकांकडून तक्रारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस व महापालिका प्रशासनाने झोन/वॉर्ड तयार करून तेथे राजपत्रित अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यांनी आपल्या भागात फिरस्तीतून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटनांचे मोबाईलवर चित्रीकरण करून त्यांच्याविरुध्द नियमानुसार गुन्हा नोंदवावा. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी. तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल व्हॉटसऍप क्रमांक जाहीर करावा. या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींवर तातडीने नियमानुसार कार्यवाही करावी. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा संघटनांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, मुंबई पोलिस अधिनियमामधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule carfyu Break and police action