धुळ्यात डेंगीचा उद्रेक; बालकांसह तरुण विळख्यात

दीड वर्षांपासून कोरोनाच्या छायेत वावरणारे धुळेकर आता डेंगीला धास्तावले आहेत.
Dengue fever
Dengue feverDengue fever

धुळे : कोरोनाशी (corona) मुकाबला करताना दमछाक झालेल्या शहरासह जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आता इतर साथीच्या आजारांशी दोन हात करावे लागत आहेत. यात महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकमध्ये डेंगीची साथ (Dengue fever) पसरत असून ठिकठिकाणीही बालकांसह तरुण रूग्ण अधिक आढळून येत असल्याने उद्रेकाची स्थिती निर्माण होण्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग (Municipal Health Department) आणि हिवताप निर्मूलन कार्यालय सतर्क असून त्यांनी विविध उपाययोजनांना गती दिली आहे. (dhule city dengue fever epidemic children and youth Infection)

Dengue fever
पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. मात्र, दीड वर्षांपासून कोरोनाच्या छायेत वावरणारे धुळेकर आता डेंगीला धास्तावले आहेत. सद्यःस्थितीत कोरोनाची दुसरी लाट सौम्य होत असताना शहरासह जिल्ह्यात डेंगीने डोकेवर काढण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते जुलैपर्यंत या आजाराचे संशयित २२०, तर डेंगीबाधित ५८ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य यंत्रणा या आजाराच्या अटकावासाठी विविध उपाययोजना राबवीत असून कर्मचारी पथके रुग्णांच्या निवासस्थानी पोचून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत.

आरोग्य यंत्रणेचे आवाहन
उकाड्यामुळे कुलर, साठवलेले पाणी, पावसामुळे गच्चीवरील किंवा इतर जागेतील भांडे, टायर आदींमध्ये पाणी साचून डेंगीच्या डासांना निवारा आणि पैदासाचे ठिकाण मिळाले आहे. त्यातूनच अशा डासांची उपज वाढते आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साचेल, अशा निरुपयोगी वस्तू, खराब टायर फेकावे. पाण्याचे भांडे, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावे. कुलर व साठवलेल्या पाण्याची ठिकाणे स्वच्छ करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे आदी उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.


प्रभाग एक विळख्यात
डेंग्यू व मलेरिया रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्ह्यात रूग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या सात महिन्यात २२० जणांचे रक्तांचे नमुने घेण्यात आले. पैकी ५८ जणांना डेंगीची लागण झाल्याचे आढळले. महापालिका क्षेत्रात डेंग्यू झालेले जून व जुलैमध्ये अनुक्रमे २० व ११, तर ग्रामीण भागात अनुक्रमे ११ आणि एक डेंग्यूचा रूग्ण आढळला. या साथीला अटकावासाठी फवारणीही केली जात आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये जे. बी. बडगुजर कॉलनी, मंगलमूर्ती सोसायटी आदी भागांत तरुणांसह बालके डेंगीच्या विळख्यात सापडली आहेत. त्यांच्याशिवाय घरात कुणाला ताप असेल आणि त्याचे प्रमाण कमी होत नसेल, डोकेदुखी, अंगदुखी जाणवत असेल तर त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, हिवताप निर्मूलन अधिकारी नितीन पाटील यांनी केले.

Dengue fever
कोविड नसलेल्या गावात आज शाळांची घंटा वाजणार

जैतोबा नगर, दैठणकर नगरात डेंग्यू
शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये जैतोबा नगर आणि दैठणकर नगर नागरी समस्यांनी बेजार झाले असून या भागात डेंगीने डोके वर काढले आहे. जैतोबा नगरातील सहा जणांना डेंगीची लक्षणे आढळल्याने उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही वसाहतींमध्ये घंटागाड्या येत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सार्वजनिक गटारी तुंबलेल्या असतात. त्यातच डेंगीच्या साथीने नागरिक चिंतेत आहेत. महापालिकेने प्रश्‍न सोडवावे, अशी मागणी पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, शहराध्यक्ष आकाश बैसाणे, मायाबाई पाटील, क्रांती खैरनार, अनंत सागर, आकाश कदम, संग्राम धिवरे, अतिक शिरसाठ यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com