esakal | धुळे शहर "ओडीएफ प्लस-प्लस'
sakal

बोलून बातमी शोधा

swach bharat mission

स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांच्या माध्यमातून नागरी क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र-राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिकांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व या शौचालयांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्याचा तगादा असतो.

धुळे शहर "ओडीएफ प्लस-प्लस'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : हागणदारीमुक्तीच्या अनुषंगाने क्‍यूसीआय या त्रयस्थ संस्थेने पाहणीअंती धुळे शहराला "ओडीएफ प्लस-प्लस' घोषित केले आहे. यापूर्वी शहराला ओडीएफ- प्लस दर्जा होता. त्यात सुधारणा होऊन ओडीएफ प्लस-प्लस दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

हेपण पहा - आईच्या रक्तासाठी मुलाची धावपळ...अन्‌ कर्मचारी अडले कागदपत्रांसाठी

स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांच्या माध्यमातून नागरी क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र-राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागरिकांना वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यात येत आहे. याशिवाय सार्वजनिक शौचालयांची निर्मिती व या शौचालयांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्याचा तगादा असतो. या सर्व उपाययोजनांची क्‍यूसीआय या त्रयस्थ संस्थेतर्फे थर्ड पार्टी इन्स्पेक्‍शन करण्यात येते. पाहणीअंती ही संस्था त्या-त्या शहरांना हागणदारीमुक्त शहरांची घोषणा करते. यंदा 15 व 16 जानेवारी 2020 ला या त्रयस्थ संस्थेने धुळे शहरात पाहणी केली होती. शहरातील सार्वजनिक शौचालयांची, काही शाळांमधील शौचालयांची पाहणी केली होती. 

ओडीएफ प्लस-प्लस दर्जा 
क्‍यूसीआयने पाहणीनंतर निकाल जाहीर केले आहेत. यात धुळे शहराला ओडीएफ प्लस-प्लस दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्यांदा धुळे शहर ओडीएफ होते, त्यानंतर ओडीएफ प्लस दर्जा मिळाला व यंदा यात सुधारणा होऊन ओडीएफ प्लस-प्लस दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 

"क्‍यूसीआय'चा निष्कर्ष असा... 
- शहरात एकूण सार्वजनिक शौचालय...48 
- "क्‍यूसीआय'कडून शौचालयांची पाहणी...12 
- प्रत्येकी चार टॉयलेट क्‍लीन, एक्‍सलंट, बेस्ट कॅटॅगरीत 

या टॉयलेटस्‌ची कॅटॅगरी अशी..
क्‍लीन टॉयलेट : पिंपळादेवी प्राथमिक शाळा मोहाडी, केंद्रीय विद्यालय, सिंधुरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, एसव्हीकेएम स्कूल 
एक्‍सलंट टॉयलेट : नागसेनवाडी देवपूर, रासकरनगर चितोड रोड, गुरुनानक सोसायटी, महात्मा गांधी पुतळा 
ऍस्पिरेशनल (बेस्ट) : यशवंतनगर, प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुल, शिवतीर्थ चौक, स्वामी नारायण मंदिर देवपूर 

loading image