esakal | धुळे जिल्हा रुग्णालयात पूर्ववत उपचार; नॉन कोविड रुग्णांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

dhule civil hospital

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असताना नागरिकांमधील गांभीर्य कमी होताना दिसत आहे. अनेक विनामास्क फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलिस पथकाने संयुक्तपणे कारवाईतून संबंधितांकडून दंड वसूल करावा.

धुळे जिल्हा रुग्णालयात पूर्ववत उपचार; नॉन कोविड रुग्णांना दिलासा

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : नॉन कोविड रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील आठवड्यापासून पूर्ववत उपचार सुरू करावे, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. त्यामुळे गरीब, सामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. 

कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. महापालिका आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असताना नागरिकांमधील गांभीर्य कमी होताना दिसत आहे. अनेक विनामास्क फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलिस पथकाने संयुक्तपणे कारवाईतून संबंधितांकडून दंड वसूल करावा. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करावी. कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी करावी. आरोग्य विभागाने कोरोना विषाणूबाधित आणि आता बरे झालेल्या रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्यावरील उपचारांचा पाठपुरावा करावा. त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल, असे नियोजन करावे. 

फिरणाऱ्यांची तपासणीसाठी स्‍टॉल
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी नियोजन करावे. कोरोना विषाणूच्या संभाव्य लसीकरणाच्या पूर्वतयारीच्या नियोजनाला वेग द्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी यंत्रणेला दिले. आयुक्त शेख म्हणाले, की विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना विषाणू रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी शहरात ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. डॉ. पाटील, डॉ. शेजवळ यांनी कोरोनाबाधित रुग्ण व नॉन कोविड रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image