esakal | स्त्री रूग्णालय सुरू करण्यावर मंथन 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule civil

सिव्हीलमध्ये शंभर खाटांचे स्त्री व बाल रूग्णालय मंजूर आहे. त्यासाठी तीन कोटी ६३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शिवाय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे.

स्त्री रूग्णालय सुरू करण्यावर मंथन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शनिवारी (ता. ३१) येथील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रूग्णालयात (सिव्हील) दुपारी साडेचारनंतर दीड तास पाहणी केली. त्यांनी कोरोनाप्रश्‍नी सिव्हीलच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तसेच या रूग्णालयात मंजूर स्वतंत्र शंभर खाटांचे स्त्री व बाल रूग्णालय सुरू करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना परिचारिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 
सिव्हीलमध्ये शंभर खाटांचे स्त्री व बाल रूग्णालय मंजूर आहे. त्यासाठी तीन कोटी ६३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शिवाय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. असे असताना स्त्री रूग्णालय सुरू न होण्याबाबत अडीअडचणी सचिव व्यास यांनी जाणून घेतल्या. हे रूग्णालय सुरू होणार नसेल तर भरतीतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घ्यावे लागेल, असे मत सचिव व्यास यांनी व्यक्त केले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे यांनी तीन कोटी ६३ लाखांचा निधी मिळाला तर वर्षभरात इमारत दुरूस्तीचे काम, सोयीसुविधा उपलब्ध होऊन स्त्री रूग्णालय सुरू करता येऊ शकेल, असे मत मांडले. यानंतर सचिव व्यास यांनी कोरोनाप्रश्‍नी सिव्हीलच्या कामकाजाची माहिती घेत कामगिरीवर समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे व सहकारी, परिचारिका उपस्थित होत्या. 

परिचारिकांनी मांडल्या समस्या 
सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी सचिव व्यास यांच्याकडे काही समस्या मांडत प्रशासकीय बदली कायमस्वरूपी बंद करावी. अशा प्रकारामुळे परिचारिकांचे कुटुंब विस्कळीत होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. शिवाय शासनाला आर्थिक भार येतो. २००५ नंतरच्या परिचारिकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. केंद्राप्रमाणे सर्व भत्ते व वेतन लागू करावे. सतत रूग्णसेवेमुळे केंद्राप्रमाणे जोखीम भत्ता दिला जावा. पद भरती लवकर व्हावी. वरिष्ठ रिक्त पदांचा प्रश्‍न मार्गी लावावा. परिचारिकांचे वेतन दरमहा एक ते पाच तारखेदरम्यान व्हावे. प्रलंबीत देयके अदा व्हावी, अशी मागणी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके, सचिव कमलेश परदेशी यांनी केली