esakal | जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी नको, अन्यथा कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

जिल्ह्यातील नागरिकांना पुरेल एवढा अन्नधान्य साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासनाने एप्रिल, मे व जूनचे धान्य एकदाच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी नको, अन्यथा कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : "कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. तसेच जिल्ह्यात 22 मार्च 2020 पासून कलम 144 लागू आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी, वाजवी दरापेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिला. 
राज्य शासनाने संचारबंदीच्या आदेशातून जीवनावश्‍यक वस्तू गहू, तांदूळ, डाळ, कडधान्य, खाद्यतेल, दूध, बेकरी पदार्थ, फळे व भाजीपाला आदी वस्तूंना वगळले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना पुरेल एवढा अन्नधान्य साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासनाने एप्रिल, मे व जूनचे धान्य एकदाच वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. 
भारतीय अन्नधान्य महामंडळाकडूनही धान्याची आवक सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार, धान्याचे घाऊक व अर्ध घाऊक व्यापारी व किरकोळ विक्रेते, खाद्यतेल व डाळींचे व्यापारी व इतर जीवनावश्‍यक वस्तूचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडचणीच्या काळात सेवा सुरळीत सुरू ठेवावी. या काळात कोणत्याही प्रकारचे साठेबाजी करू नये. वस्तूंचे कृत्रिम भाव वाढवून नफेखोरीचा प्रयत्न करू नये. जीवनावश्‍यक वस्तूंची साठवणूक केल्यास किंवा अवाजवी दरात विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घेत संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी केले. 

loading image