esakal | धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभर लॉकडाउन कालावधीत वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभर लॉकडाउन कालावधीत वाढ 

१४ मार्चच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभर लॉकडाउन कालावधीत वाढ 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित आदेश निर्देश, नियमावलीनुसार लागू राहतील, असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. 


जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मार्चच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणणे व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांचे सक्षम प्राधिकारी आहेत.

याआधारे जिल्ह्यासाठी लॉकडाउनचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविला. तो आता शासनाकडून वेळोवेळी शिथिल निर्बंध व सूट देण्यासंबंधी बाबी कायम ठेवत ३१ जानेवारीपर्यंत लागू झाला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित शिक्षेस पात्र राहील. 

loading image