धुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला; नवे ३८ बाधित 

रमाकांत घोडराज
Saturday, 20 February 2021

जिल्ह्याचा दैनंदिन अहवाल पाहता कोरोनाबाधितांची संख्या नगण्य येत होती. तीनपर्यंत हा आकडा खाली आल्याचेही पाहायला मिळाला होता.

धुळे ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चढता राहिल्याचे समोर आले. आज तब्बल ३८ बाधित आढळून आले. गुरुवारी जिल्ह्यात २८ बाधित होते. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोर धरेल की काय अशी स्थिती सध्या समोर येत आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचा दैनंदिन अहवाल पाहता कोरोनाबाधितांची संख्या नगण्य येत होती. तीनपर्यंत हा आकडा खाली आल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा बाधित वाढत असल्याचे दिसते. गुरुवारी जिल्ह्यात २८ बाधित समोर आले होते, यात शुक्रवारी पुन्हा भर पडली असून ही संख्या आज ३८ पर्यंत गेली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १५ हजार ६८ वर पोहोचला.

शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (१२९ पैकी १८) ः आंबेडकर नगर-१, सुंदर नगर-२, न्हावी कॉलनी-१, मयूर कॉलनी-१, भाईजी नगर-१, बाळापूर -१, देवभाने-१, देवपूर धुळे-२, वलवाडी-४, बेंद्रेपाडा-१, आनंद नगर-१, एसआरपीएफ धुळे-१, सुदर्शन नगर-१. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (१५ पैकी ००). उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (३३ पैकी ०१) ः रसीकलाल पटेल नगर शिरपुर-१. भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (७१ पैकी ०४) ः सरस्वती नगर साक्री-२, विमलबाई कॉलनी साक्री-१, सुशिला नगर साक्री-१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (२० पैकी ००) ः धुळे-१. धुळे महापालिका (८३ पैकी ००). खासगी लॅब (३७ पैकी १४) ः डॉली निवास विघ्नहर्ता कॉलनी वलवाडी शिवार धुळे-१, परिवहन कॉलनी, दत्तमंदिर, देवपूर धुळे-२, प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे-२, आनंद नगर भोई सोसायटी देवपूर-१, सुंदर नगर वलवाडी शिवार-१, बडगुजर प्लॉट दत्तमंदिर जवळ पारोळा रोड-१, जय मल्हार नगर साक्री रोड धुळे-१, पाडवी सोसायटी साक्री रोड धुळे-२, अग्रवाल नगर मालेगाव रोड धुळे-१, नटराज थिएटरमागे अमोल सोसायटी वाखारकार नगर धुळे-२. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona new patient increasing

टॉपिकस