धुळे शहरातील २६ कंटेन्मेंट झोन रद्द !

रमाकांत गोदराज
Tuesday, 11 August 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जास्त संपर्कात असलेल्या व्यक्तींची संस्थात्मक क्वारंटाइनची मुदत संपून होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची मनपा आरोग्याधिकाऱ्यांनी पुढे १४ दिवस तपासणी कायम ठेवावी,

धुळे ः कोरोना संक्रमित रुग्ण आढळून न आल्याने महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील विविध भागातील २६ कंटेन्मेंट झोन रद्द केले आहेत. काही अटी-शर्तींवर हे झोन रद्द करण्याचा आदेश श्री. शेख यांनी काढला आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या रहिवासाचे क्षेत्र सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. या प्रक्रियेत यापूर्वी घोषित झालेल्या व नंतरच्या काळात त्या भागात नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून न आल्याने, तसेच कंटेन्मेंट झोनची १४ दिवसांची मुदत संपल्याने हे कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले आहेत.

रद्द झालेले कंटेन्मेंट झोन असे ः कंटेन्मेंट झोन-४२८-गुरुदत्त कॉलनी, महालक्ष्मी मंदिराजवळ, इंदिरानगर, ४२९- नकाणे, ४३०- चितोड, ४३१- सुंदरेज कॉलनी, अग्रसेन शाळेजवळ, ४३२- देशमुख वाडा, ४३३- जुने धुळे, देवीदास कॉलनी, ४३४- जुने धुळे, गल्ली नंबर-१०, ४३५- जुने धुळे, गढीवर, शाळा क्रमांक-१६ च्या मागे, ४३६- भागवत सायकल मार्टसमोर, पवननगर, हुडको, चाळीसगाव रोड, ४३७- महात्माजी स्वीट, ४३८- जुने धुळे, ४३९- अवधान, ४४०- प्लॉट नंबर-७०, नंदनवन सोसायटी, नकाणे रोड देवपूर, ४४१- तुळशीरामनगर, ठाकरे गॅरेजमागे, देवपूर, ४४२- इंदिरा गार्डन, देवपूर, ४४३- जय मल्हारनगर, साक्री रोड, ४४४- पाटकरनगर, देवपूर, ४४५- १७८ फॉरेस्ट कॉलनी, ४४६- महर्षी व्यासनगर, देवपूर, ४४७- भरतनगर, ४४८- प्लॉट नंबर ४१-अ, अजय नगर, देवपूर, ४४९- साने गुरुजी हौसिंग सोसायटी, मातोश्री बंगला, ४५०- बाहुबली कॉलनी, साक्री रोड, ४५१- अग्रवालनगर, लक्ष्मी बंगला टॉवरजवळ, ४५२- वर्षावाडी मोहाडी, ४५३- गल्ली नंबर-६, प्रकाश चौक, कोंडाजी व्यायामशाळा. 

या क्षेत्रातील नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जास्त संपर्कात असलेल्या व्यक्तींची संस्थात्मक क्वारंटाइनची मुदत संपून होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची मनपा आरोग्याधिकाऱ्यांनी पुढे १४ दिवस तपासणी कायम ठेवावी, लक्षणे आढळल्यास तत्काळ मनपा आरोग्याधिकाऱ्यांना कळवावे आदी अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

 
संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona twenty six containment zones in dhule city canceled