esakal | धुळे जिल्ह्यात सहा हजार कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

एकूण आठ हजार १७० रुग्णांचा टप्पा पार केला. तसेच दिवसभरात बाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला. नवे १८९ रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्यात तुलनेत सहा हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

धुळे जिल्ह्यात सहा हजार कोरोनामुक्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असताना जिल्ह्याने शनिवारी (ता. २९) एकूण आठ हजार १७० रुग्णांचा टप्पा पार केला. तसेच दिवसभरात बाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला. नवे १८९ रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्यात तुलनेत सहा हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
दोंडाईचा येथील ५८ वर्षीय, फागणे येथील १७, निजामपूर येथील ६३, नेर येथील ५५, बाळापूर येथील ६५ वर्षीय आणि धुळे शहरातील खासगी रुग्णालयात ६२ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे एकूण बळींची संख्या २४५ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त सहा हजार १२८ पैकी महापालिका क्षेत्रातील दोन हजार ९८०, धुळे तालुक्यातील ८०३, शिरपूर तालुक्यातील एक हजार ३३०, शिंदखेडा तालुक्यातील ७५३, तर साक्री तालुक्यातील ४६२ रुग्णांचा समावेश आहे. 
दिवसभरात जिल्ह्यात आढळलेले १८९ रुग्ण असे : धुळे जिल्हा रुग्णालय कुमारनगर, चिंचवार, दसवेल, खंडेराव पोलिस सोसायटी, फागणे, स्नेहनगर, जुने धुळे, देवमोगरा कॉलनी वलवाडी, आर्वी, नवनाथनगर, जीटीपी स्टॉप, स्वामिनारायण कॉलनी, चंपा बाग, वैभवनगर, मुकटी, सिंहस्थनगर साक्री रोड, महालक्ष्मी कॉलनी, नेर, अंचाळे, न्याहळोद, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा, कोठारी पार्क, रावलनगर, रोहाणे, कर्ले, दसवेल, धमाणे, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, बालाजीनगर, सरस्वती कॉलनी, वाल्मीकनगर, वरवाडे, दौलतनगर, गणेश कॉलनी, पित्रेश्वर कॉलनी, सदाशिवनगर, सुभाषनगर, शिवपार्वती कॉलनी, रसिकलाल पटेलनगर, श्रीनगर, चंद्रनगरी, वकील कॉलनी, क्रांतीनगर, करवंद नाका, जवखेडा, दहीवद, तरडी, तऱ्हाडी, भाटपूरा, शिंगावे, अर्थे, बाळदे, थाळनेर, वाघाडी, तावखेडा, गुजर खरदे, गरताड, बालकुवा, कुवे, पिंपरी, होळनांथे, अजंदे (बेटावद), भाडणे कोविड केअर सेंटर- शेणपूर, रामनगर- पिंपळनेर, नाना चौक- पिंपळनेर, छडवेल, नगरेनगर- साक्री, महापालिका पॉलिटेक्निक सेंटर- राजगुरूनगर, प्रकाश पुष्प अपार्टमेंट, वीटभट्टी, जुने धुळे, प्रभातनगर, शकुंतला कॉलनी, जीटीपी स्टॉप, धनाई पुनाई कॉलनी, समृद्धीनगर, पोलिस हेडक्वार्टर, कुमारनगर, स्वामीनगर, यशवंतनगर, दोंदे कॉलनी, बालाजीनगर, प्रोफेसर कॉलनी, भावसार कॉलनी, मनमाड जीन, नारायण मास्तर चाळ, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- धुळे, शिंदखेडा, शिरपूर, साक्री, अमळनेर, धुळे खासगी लॅब- शांती निकेतन सोसायटी, रामकृष्णनगर, राम मंदिराजवळ, शिवपार्वती कॉलनी, वाखारकरनगर, ग. द. माळी सोसायटी, शिवसागर सोसायटी, पद्मनाभनगर, सद्‍गुरू कॉलनी, दत्तमंदिर देवपूर, अरुणकुमार वैद्यनगर- साक्री रोड, गल्ली क्रमांक दोन, झुलेलाल सोसायटी, जुना आग्रा रोड, विष्णूनगर, अमराळे- शिंदखेडा, अंचाळे, आर्वी, देऊर, तामसवाडी- साक्री, पिंपळनेर. 

मनपा सेंटरवर वाद 
महापालिका पॉलिटेक्निक कोविड केअर सेंटरवर उशिराने जेवण, चहा- नाश्ता मिळत असल्याने रुग्णांनी नाराजीसह संताप व्यक्त केला. ते थेट रस्त्यावर आले. त्यांनी ही कैफियत मांडत सोशल मीडियावर क्लिप व्हायरल केली. मधुमेह, विविध व्याधींच्या रुग्णांना वेळेत चहा, नाश्ता, जेवण लागते. त्यांना विलंबाने आहार मिळत असल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे कैफियत मांडली. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि महापालिका आयुक्तांना दोषींवर योग्य त्या कारवाईची सूचना दिली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश घुगे यांनी दिली. 

loading image
go to top