लॉकडाऊन कालावधीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे.

धुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे. 

जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी उपाययोजना राबविण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. शासनाकडून वेळोवेळी शिथिल निर्बंध व सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून लॉकडाऊनचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आला आहे. यासंबंधी आदेशाचे उल्लंघन झाल्यास विविध कलमांन्वये संबंधित शिक्षेस पात्र राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule coronavirus lockdown 30 november