धुळे : कोरोना बाधितांचा आकडा आला बोटावर 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह बळींची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोनाबाधितांच्या आकडा लक्षणीयरीत्या घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेखाची तळाकडे घसरण्याची प्रक्रिया सलग तिसऱ्या कायम राहिली. बाधितांचा आकडा बोटावर मोजण्याएवढा खाली आला आहे. आज (ता.१३) बाधितांचा आकडा सातपर्यंत खाली घसरला. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबळींचा आकडाही स्थिरावला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी ही स्थिती समाधान देणारी ठरली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह बळींची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोनाबाधितांच्या आकडा लक्षणीयरीत्या घसरल्याचे पाहायला मिळत आहे. ११ ऑक्टोबरला १० बाधित तर एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. १२ ऑक्टोबरला १३ बाधित व मृत्यू एकही नव्हता. आज (ता.१३) सायंकाळी साडेपाचच्या अहवालानुसार दिवसभरात एकूण २५१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील केवळ सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. शिवाय एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. मंगळवारी जिल्ह्यातील बाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (१२१ पैकी ०३), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (१९ पैकी ००), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (२९ पैकी ००), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (२६ पैकी ०२), महापालिका पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटर (४१ पैकी ०१), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१५ पैकी ०१). दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 
१२ हजार ९१४ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule coronavirus positive case ratio down