
जिल्ह्यातील कोरोनाबाधित व बळींचा आलेख खाली आला आहे. विशेषतः कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.
धुळे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एका ७८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (ता.८) मृत्यू झाला. गेल्या काही दिवसानंतर आज कोरोनाचा एक बळी समोर आला. जिल्ह्यात आज १३ नवीन कोरोनाबाधितही समोर आले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित व बळींचा आलेख खाली आला आहे. विशेषतः कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. गेल्या काही दिवसानंतर आज धुळे शहरातील गल्ली नंबर ५ मधील ७८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे धुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाळींची संख्या १६८ तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३८० वर पोहोचली. दरम्यान, आज नवीन १३ बाधितही आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर १४ हजार ७१ झाली. मंगळवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (८९ पैकी ०४), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (५५ पैकी ००), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (१०४ पैकी ००), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (५९ पैकी ०६), धुळे महापालिका (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १८८ पैकी ००), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (०७ पैकी ००), खाजगी लॅब (१५ पैकी ०३).