किस में कितना है दम! 

सोमवार, 3 डिसेंबर 2018

धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लोकसंग्रमाचे आमदार अनिल गोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कॉंग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील व आमदार कुणाल पाटील यांचे नेतृत्व निवडणुकीत पणाला लागले आहे. त्यामुळे आपापल्या उमेदवारांच्या यशासाठी नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. 
 
डॉ. भामरेंचा ठिय्या 

धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लोकसंग्रमाचे आमदार अनिल गोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कॉंग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील व आमदार कुणाल पाटील यांचे नेतृत्व निवडणुकीत पणाला लागले आहे. त्यामुळे आपापल्या उमेदवारांच्या यशासाठी नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. 
 
डॉ. भामरेंचा ठिय्या 
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे निवडणूक जाहीर झाल्यापासून धुळ्यात ठिय्या मारून आहेत. "राम कॉम्प्लेक्‍स'मधील त्यांच्या कार्यालयात ते व्यूहरचनेसाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. या शिवाय ते रोज एका प्रभागात जाऊन पक्षाच्या उमेदवारांसोबत प्रचारात सहभागी होत जनतेला मतदानाचे आवाहन करीत आहेत. तसेच शहरातील विविध भागांत, हद्दवाढीतील गावांत सभा घेऊन पक्षाच्या विकासाची भूमिका मतदारांना पटवून देत आहेत. हा विकास कसा असेल, याचीही ते माहिती देत आहेत. 
 
गोटेंच्या कार्नर सभा 
आमदार अनिल गोटे यांचे उमेदवार "लोकसंग्राम'च्या माध्यमातून रणांगणात आहेत. त्यांची उमेदवारी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला मोठे आव्हान आहे. याशिवाय गोटे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आता तेही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. वेगवेगळ्या प्रभागांत ते उघड्या जीपमधून फेरी काढून जनतेला आवाहन करीत असतात. काही प्रभागांत त्यांच्या कॉर्नर सभाही होत आहेत. 
 
कदमबांडेंच्या सभा, रॅली 
राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्ता आहे. ती कायम राखण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. मात्र, यावेळी त्यांचे काही सहकारी नगरसेवक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यांच्या जागेवर त्यांनी नवीन उमेदवार दिल्याने त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही कदमबांडे यांच्यावर आहे. यामुळे प्रत्येक प्रभागातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचार फेरीत सहभाग घेऊन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत. काही भागांत कॉर्नर सभाही घेत आहेत. 

रोहिदासदाजी,कुणाल पाटलांचा प्रचार 
कॉंग्रेसच्या दृष्टीने महापालिका निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत धुळे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे धुळे शहरातून आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणल्यास पक्षाला बळ मिळणार आहे. यासाठी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील व त्यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही नेत्यांकडून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. कॉर्नर सभांसह मतदारांच्या भेटी घेत उमेदवारांना विजयाचे आवाहन करत आहेत. 
 
शिवसेना नेत्यांचाही जोर 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. युती न झाल्यास धुळे लोकसभा मतदारसंघात पक्षाचा उमेदवार स्वतंत्र राहील. त्यामुळे महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे 13 नगरसेवक होते. यावेळी त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख के. पी. नाईक निवडणूक जाहीर झाल्यापासून धुळ्यात आहेत. ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन आवाहन करीत आहेत. 

महाजन, रावल यांची प्रतीक्षा 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजपने धुळे महापालिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्यासोबत रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर भार सोपविण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांनी प्रारंभीच्या काळात धुळ्यात उपस्थिती दिली. मात्र, आता उमेदवारांना प्रचार सभांमध्ये या नेत्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने ते आतापर्यंत सहभागी होऊ शकले नव्हते. आता मात्र ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होतील. 
 

Web Title: marathi news dhule corporation election