गणेश विसर्जन दोन दिवसांवर; धुळे मनपाने घेतला असा निर्णय

निखील सुर्यवंशी
Saturday, 29 August 2020

घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव केले आहेत. नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन करावे, मिरवणूक काढू नये, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका व पोलिसांनी केले आहे. 

धुळे  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश विसर्जनासाठी गर्दी होणार नाही, यासाठी महापालिका व पोलिसांनी शहरात ३७ ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव केले आहेत. नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन करावे, मिरवणूक काढू नये, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका व पोलिसांनी केले आहे. 
दरम्यान, पांझरा नदीकाठी मूर्ती विसर्जनास पूर्णतः प्रतिबंध आहे. नागरिकांनी आपल्या भागातील कृत्रिम तलावातच विसर्जन करावे. मिरवणुका काढू नयेत. आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. भाविकांनी शंभर टक्के शारीरिक अंतराचे पालन करावे, मास्क लावावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका व पोलिसांनी केले आहे. 

या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था 
धुळे शहर पोलिस ठाणे : संगमा चौक, गोळीबार टेकडी रोड, जय मल्हार कॉलनी, लक्ष्मीनारायण लॉन्सजवळ, संभाप्पा कॉलनी चितोड रोड, शाळा नंबर २८, चितोड नाका पोलिस चौकीजवळ, दसेरा मैदान, फाशोपूल चौक, संतोषीमाता चौक, जे. के. ठाकरे हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, हॉटेल तरंग टी जवळ, शहर पोलिस चौकी. 
आझादनगर पोलिस ठाणे : पारोळा चौफुली, गिंदोडिया चौक, गोल पोलिस चौकीसमोर, अरिहंत मंगल कार्यालयाच्या अलीकडे टी-पॉइंट, कानुश्री मंगल कार्यालय जुने धुळे, किसनबत्ती वाला खुंट/शाळा नंबर-९ जवळ, जुने अमळनेर स्टॅण्डजवळ. 
देवपूर : जयहिंद सीनिअर कॉलेजजवळ, नेहरू चौक, दत्तमंदिर, सावरकर पुतळा, जीटीपी स्टॉप, एसएसव्हीपीएस कॉलेज चौक, डीसी कॉलेजजवळ, संतसेनानगर. 
पश्चिम देवपूर पोलिस ठाणे : जिल्हा क्रीडासंकुल चौक, वाडीभोकर रोड, वलवाडी टी-पॉइंट, वाडीभोकर रोड स्वामी समर्थ पेट्रोल पंपासमोर, नकाणे रोड टी-पॉइंट, राजाराम पाटीलनगर फलकाजवळ, मोराणकर बंगला चौक. चाळीसगाव रोड पोलिस ठाणे : अग्रवालनगर पंचक्रोशी परिसरातील मैदान, सप्तश्रृंगीनगर परिसरातील मोकळे मैदान, श्री सूर्यमुखी मारुती मंदिराजवळचे मोकळे मैदान, श्री अग्रसेन महाराज पुतळ्याजवळ गरबा मैदान. -मोहाडी : अवधान फाटा (एमआयडीसी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation ganesh visrjan create 37 Artificial lake