ऑफलाइन, ऑनलाइन नकाशांचे सुधारीत दर वाढले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाकडून शहर विकास योजना व नगर रचना आदींचे भाग नकाशे/ सनदा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीतील वाढ कर्मचाऱ्यांचे वेतन आदींमध्ये झालेली वाढ लक्षात घेता ७ फेब्रुवारी २००० च्या शासन निर्णयान्वये सुधारित दर पुढील तीन वर्षासाठी सुधारित केले होते.

धुळे : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने शहर विकास योजना व नगर रचना आदींचे भाग नकाशे/ सनदा ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करण्याचे सुधारित दर निश्‍चित केले आहेत. विद्यमान दरांच्या तुलनेत सुधारित दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसते. 

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाकडून शहर विकास योजना व नगर रचना आदींचे भाग नकाशे/ सनदा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीतील वाढ कर्मचाऱ्यांचे वेतन आदींमध्ये झालेली वाढ लक्षात घेता ७ फेब्रुवारी २००० च्या शासन निर्णयान्वये सुधारित दर पुढील तीन वर्षासाठी सुधारित केले होते. आता नगर रचना संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व जिल्ह्यातील संबंधित शाखा कार्यालयाकडून मंजूर प्रादेशिक योजनेनुसार व विकास योजनेनुसार नागरिकांना/ हितसंबंधितांना भाग नकाशे/ झोन नकाशे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या किमतीत वाढ, कर्मचाऱ्यांचे वेतन आदींमध्ये वाढ झाल्याने दरात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार भाग नकाशे/झोन दाखले ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित दर निश्‍चित केले. पुढील तीन वर्षासाठी किंवा तत्पूर्वी गरज वाटल्यास सुधारित करण्याच्या अटीवर या दरांना मान्यता देण्यात आली आहे. 

भाग नकाशे ऑफलाइनचे सुधारित दर असे

नकाशा...विद्यमान दर...सुधारित दर (रंगीत प्रत) 
..........ब्लॅक ॲण्ड व्हाईट, रंगीत प्रत.......... 
-पूर्ण आकार (२० बाय ३० सेंमी, ए-४ साइज)...३०...६०...७०० 
-३० बाय ४५ सेंमी (ए-३ साइज)...४०...८०...११०० 
-४५ बाय ६० सेंमी (ए-२ साइज)...५०...१००...१५०० 
-६० बाय ९० (ए-१ साइज)...६०...१२०...२५०० 
-७५ बाय १०५ (ए० साइज)...८०...१६०...६८०० 
-एक अंतिम व त्याचा मुळ भूखंडाचा भाग नकाशा...---५०...७०० 
-दोन अंतिम भूखंड व त्याच्या मूळ भूखंडाचा भाग नकाशा...---८०...१५०० 
-दोनपेक्षा अधिक अंतिम भूखंड व त्यांचा मूळ भूखंडाचा भाग नकाशा...---१४०...२५०० 
-अंतिम भूखंडाच्या सनदेच्या दुसऱ्या प्रतीसाठी...---५०...३००० 
-अंतिम भूखंडाच्या सनदेच्या दुसऱ्या प्रतीसाठी...---४०...८०० 
-एका अंतिम भूखंडाच्या नोंदीच्या उताऱ्यासाठी...३०...---...२०० 
-स. न. गट नं. च्या प्रमाणपत्राच्या एका प्रतीसाठी...---...३०...३०० 
-नकाशे, भाग नकाशे यांची सीडी (१ जीबीपर्यंत)...---...---...५०० 
-मंजूर रेखाकन/बांधकाम नकाशाच्या सत्यप्रती, आदेशाची (शिफारस) प्रत...---...---...आदेशाच्या प्रतीसाठी पाच रुपये, ए-४ साठी ५० रुपये, ए-३ साठी १०० रुपये, ए-२ साठी १५० रुपये व ए-१ साठी २०० रुपये (नकाशा) 
 
ऑनलाइन पद्धतीने भाग नकाशे/ झोन दाखले देण्यासाठी शुल्क...ए-४ आकारासाठी २५० रुपये प्रती सर्व्हे नंबर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation improved rates for maps increased