esakal | त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून नागरिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. अशा नियम मोडणाऱ्या दुकानदार, फेरीवाले, नागरिकांवर गुरुवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई केली, त्यांचे नाव-पत्ता घेण्यात आले.

त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढलेला असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा प्रश्न आल्याने ही प्रक्रिया गुरुवारी अपूर्ण राहिली होती. दरम्यान, संबंधितांच्या नावांचे पोलीस ठाणे हद्दीनिहाय वर्गवारी झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. साधारण ७३ जणांवर ही कारवाई होणार आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून नागरिक, दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. अशा नियम मोडणाऱ्या दुकानदार, फेरीवाले, नागरिकांवर गुरुवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई केली, त्यांचे नाव-पत्ता घेण्यात आले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनपाचे कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले खरे पण विविध भागात कारवाई झाल्याने पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा प्रश्न समोर आला. त्यामुळे संबंधितांच्या नावांच्या वर्गवारीचे काम सुरू होते. ते आज पूर्ण झाले असून त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

आयुक्तांचे पोलिसांना पत्र 
गुरुवारी शहरातील झाशी राणी पुतळा ते पारोळारोड, जेबी रोड, पाचकंदील आदी ठिकाणी काही व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. संबंधितांनी फिजिकल डिस्टन्सींग न ठेवणे, गर्दी करणे, मास्क न लावणे, सम-विषम तारखेच्या नियमाचे पालन न करून साथरोग वाढीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला अ ाहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्रच आयुक्त श्री. शेख यांनी पोलिसांना दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. 
 

loading image
go to top