esakal | धुळे राज्यात दुसरे, देशात नववे...कशात मारली बाजी पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

swachh bharat abhiyan

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यावेळी ऑनलाइन झाला. केंद्र शासनाच्या नागरिकार्य व गृहनिर्माण विभागातर्फे हा कार्यक्रम यू-ट्यूबच्या माध्यमातून दाखविण्यात आला. धुळे महापालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात आला.

धुळे राज्यात दुसरे, देशात नववे...कशात मारली बाजी पहा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये धुळे महापालिकेने देशात नववा तर राज्यात थेट दुसरा क्रमांक पटकाविण्याची किमया साधली. स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा गुरुवारी निकाल लागला. यात धुळे शहर राज्यासह देशात चमकले. या निकालामुळे महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 
स्वच्छ सर्वेक्षण-२०२० पुरस्कारांचे वितरण स्वच्छ महोत्सवात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यावेळी ऑनलाइन झाला. केंद्र शासनाच्या नागरिकार्य व गृहनिर्माण विभागातर्फे हा कार्यक्रम यू-ट्यूबच्या माध्यमातून दाखविण्यात आला. धुळे महापालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात आला. उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, आयुक्त अजीज शेख, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. 

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने झालेल्या कामांची खासगी संस्थेच्या माध्यमातून पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला जातो. शहरातील रस्ते, कॉलनी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, शाळा, धार्मिक स्थळे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, हॉटेल्स आदी विविध ठिकाणी स्वच्छता व स्वच्छतेसंबंधी केलेल्या उपाययोजनांची समिती पाहणी करते. याशिवाय नागरिकांचा फीडबॅक, स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे आदी विविध बाबींना गुण देऊन याचा निकाल घोषित केला जातो. यात धुळे महापालिकेने सहा हजार पैकी एकुण चार हजार ८९६.९९ गुण मिळविले. यामुळे धुळे शहराने देशात नववा तर राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. 

लोकसंख्येनुसार वर्गवारी 
स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल लोकसंख्येच्या वर्गनुसार जाहीर केला जातो. एक ते दहा लाख व दहा लाखावर लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असतो. धुळे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख ७५ हजार ५५९ आहे. त्यामुळे दहा लाखाच्या आतील लोकसंख्येच्या वर्गवारीत धुळ्याने बाजी मारली. 

रँकींग आणि स्कोर असा 
देशात ः १- अंबिकापूर (स्कोर-५४२८.३१), २- मैसूर (५२९८.६१), ३- नवी दिल्ली (एनडीएमसी) (५१९३.२७), ४- चंद्रपूर (५१७८.९३), ५- खरगोन (५१५८.३६), ६- तिरुपती (५१४२.७६), ७- जमशेदपूर (५१३३.२०), ८- गांधीनगर (५०५६.७२), ९- धुळे (४८९६.९९), १०- राजनंदगाव (४८८७.५०) 

राज्यात : ४- चंद्रपूर (५१७८.९३), ९- धुळे (४८९६.९९), १८- अंबरनाथ (४६१४.०४), १९- मिरा-भाईंदर (४६०८.१४), २०- पनवेल (४५९९.७४), २२- जालना (४५३५.१७), २६- भिवंडी-निजामपूर (४३९६.१२), ३२- कोल्हापूर (४२७४.३४), ३६- सांगली (४१६३.४१), ३७- अमरावती (४१६०.२४), ३८- बार्शी (४१५३.३९), ४०- नगर (४१४७.६२), ४१- नंदूरबार (४१२४.६३). 
 

loading image