esakal | धुळ्यात वाइन शॉप उघडताच उडाली झुंबड !

बोलून बातमी शोधा

धुळ्यात वाइन शॉप उघडताच उडाली झुंबड !
धुळ्यात वाइन शॉप उघडताच उडाली झुंबड !
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : राज्य सरकारने मद्याच्या घरपोच सुविधेला परवानगी दिली आहे. यासंबंधीची माहिती मिळताच तळीरामांनी बुधवारी (ता. २१) शहरातील जेल रोड परिसरातील एका वॉइन शॉपवर खरेदीसाठी गर्दी केली. या प्रक्रियेत अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नंतर विक्रेत्याला दुकान बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली.

हेही वाचा: कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा

सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केल्यानंतर मद्याची घरपोच सुविधा सुरू ठेवण्याचा आदेश दिला. मद्याची वाहतूक करताना अडचण येणार नाही, याबाबत दक्षतेचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले. त्यामुळे तळीरामांना घरपोच सुविधा मिळू शकेल, असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील जेल रोडवरील एक वाइन शॉप बुधवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास उघडले. सरकारने मद्यविक्रीस परवानगी दिल्याचा तळीरामांचा समज झाला. त्यामुळे संबंधित विक्रेत्याकडे तळीरामांनी मोठी गर्दी केली. ही स्थिती नियंत्रणासाठी शहर पोलिसांना पुढे यावे लागले. त्यांनी गर्दी पांगविल्यानंतर विक्रेत्याला दुकान बंद करण्याची सूचना केली.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

निर्धारित वेळेतच वाइन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारू विक्रेत्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दुकानावर दर्शनीय भागात लावायचा आहे. याआधारे ग्राहकांनी संपर्क साधत घरपोच सुविधेची नोंद करायची आहे. व्हॉट्सअॅपवर संपर्काची सुविधाही देण्यात आली. दुकानातून मद्यविक्रीला बंदी आहे. दुकानदारांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना द्यावी. नंतर ते कर्मचारी घरपोच सुविधा देतील. त्यासाठी ग्राहकांकडे मद्यसेवनाचा परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना एक दिवसाचा परवाना घ्यावा लागेल. तो मद्य विक्रेत्याकडूनही मिळू शकेल. मूळ किमतीत (एमआरपी) मद्यविक्रीची सूचना सरकारने दिली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे