
अठरा सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. यातील १२ सायकलस्वारांनी हे अंतर निर्धारित वेळेआधीच पूर्ण केले.
धुळे : धुळे- ठिकरी (मध्य प्रदेश)- धुळे- नाशिक- धुळे अशा तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर ४० तासांत पूर्ण करण्याची कामगिरी १२ सायकलस्वारांनी केली. या सायकलस्वारांचा येथे सत्कार करण्यात आला. चांगल्या आरोग्यासाठी सायकलचा वापर, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
आवश्य वाचा- शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, काय आहे गावाचे रहस्य
फ्रान्समधील ऑडॅक्स सायकलिंग क्लबशी संलग्न धुळे सायकलिस्टतर्फे ६०० किलोमीटर अंतराची स्पर्धा नुकतीच झाली. धुळे-ठिकरी (मध्य प्रदेश)- धुळे- नाशिक- धुळे असे या स्पर्धेचे अंतर होते. हे ६०० किलोमीटरचे अंतर स्पर्धकांना ४० तासांत पूर्ण करावयाचे होते. यात एकूण अठरा सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. यातील १२ सायकलस्वारांनी हे अंतर निर्धारित वेळेआधीच पूर्ण केले.
मोहिमेत यांचा होता समावेश
यात संभाजी पाटील, विद्याधर इंगळे, वीरेंद्र फिरके (जळगाव), ललित ऊर्फ टोनी पंजाबी, अरुण महाजन (चाळीसगाव), प्रवीण फालक, गनसिंग पाटील (भुसावळ), पुरुषोत्तम मोरे, रामदास सोनवणे, मुस्तफा टोपीवाला, गणेश कुंवर (नाशिक) यांचा समावेश होता.
आवश्य वाचा- ‘जीएमसी’त पॉझिटिव्ह तर खासगीत ‘निगेटिव्ह’;कोरोना संशयितांच्या जिवाशी खेळ सुरूच !
यशस्वी सायकलस्वारांचे स्वागत
या सर्व यशस्वी सायकलस्वारांचे येथील गुरुद्वारा येथे स्वागत तथा सत्कार झाला. आर. सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेज (शिरपूर)चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी सत्कार केला. स्पर्धेसाठी धुळे सायकलिस्टच्या सदस्यांसह अनिल जाधव, प्रवीण माळी, शैलेंद्र चोरडिया, शरद पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेची तांत्रिक बाजू पराग पाटील आणि जे. बी. पाटील यांनी सांभाळली. दरम्यान, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनील नाईक (धुळे) यांनी सहाशे किलोमीटर अंतर पूर्ण करताना चौथ्यांदा सुपर रेन्डोनर पुरस्कार प्राप्त केला.
संपादन- भूषण श्रीखंडे