esakal | अखेर ८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्‍त 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. ८३ पंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश शुक्रवारी काढले. धुळे तालुक्यातील ४०, शिंदखेडा २१ व साक्री तालुक्यातील २२ पंचायतींवर प्रशासक नियुक्ती झाली आहे.

अखेर ८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्‍त 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मुदत संपूनही प्रशासक नियुक्ती झालेली नाही. ‘सरपंच व प्रशासकविना पंचायतींचा कारभार राम भरोसे सुरू’ असल्याचे वृत्त शुक्रवारी (ता. २८) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले अन्‌ जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. ८३ पंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश शुक्रवारी काढले. 
धुळे तालुक्यातील ४०, शिंदखेडा २१ व साक्री तालुक्यातील २२ पंचायतींवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. प्रशासक नेमणुकीसंदर्भात लोकहित याचिका निर्णय प्रलंबित आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रशासकांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. 

प्रशासक नियुक्ती अशी 
धुळे तालुका : कापडणे- टी. के. तिवारी, आमदड- वजीरखेडे बी. व्ही. पाटील, उडाणे- आर. डी. मेहेंदळे, कुंडाणे- वेल्हाणे- आर. डी. नांद्रे, खेडे- सुट्रेपाडा- आर. एस. दंडगव्हाळ, चिंचखेडे व तरवाडे- बी. व्ही. पाटील, नवलाणे- एस. एस. पाटील, बिलाडी- टी. के. तिवारी, बोरसुले, नवे कोठारे- वडजाई- बी. ए. भामरे, वणी- बु.पी. झेड. रणदिवे, सोनगीर, खंडलाय व वडगाव- के. एन. वाघ, गोंदूर- एस. एस. पाटील, मोरदड तांडा- बी. व्ही. पाटील, निकुंभे- बी. ए. भामरे, बल्हाणे-एस. ए. कोळी, मोघण-पी. के. पारधी, अजंग व कासविहिर- एस. एस. भामरे, खंडलाय खुर्द व बांबुर्ले- के. एन. वाघ, रामी- एम. डी. सोनवणे, लळींग व दिवाणमळा पी. झेड. रणदिवे, शिरधाने प्र.नेर- एम. डी. सोनवणे, नेर व सायने- एम. डी. सोनवणे, विंचूर- बी. व्ही. पाटील, सांजोरी- दंडगव्हाळ, सोनेवाडी, चौगावे, दापूरा दापूरी व मोरदड येथेही प्रशासक नियुक्ती झालीय. साक्री तालुका : कढरे- सी. एस. अहिरे, ऐचाळे- एच. डी. महंत, बेहेड व धमणार- बी. डी. कुवर, जैताणे- जे. पी. खाडे, खुडाणे- एस. एस. भामरे, मालपूर- एस. आर. बागले, उंबरखडवा- एच. डी. महंत, म्हसदी प्र.नेर- ए. पी. महाले, मालनगाव एस. एस. भामरे, सातमाने- आर. ए. पगारे, विटाई- एच. डी. महाले, छडवेल- पी. एस. महाले, आखाडे खाडे, महिर, शेवाळी व शेणपूर- ए. पी. महाले, शिंदखेडा तालुका : अजंदे- एस. एच. भामरे, डाबली- डी. बी. पाटील, धावडे व हतनूर- डी. एस. सोनवणे, कामपूर- व्ही. बी. घुगे, खलाणे- जी. डी. देवरे, लोहगाव- वसमाने- पी. के. सावंत, मंदाणे व सोनेवाडी- सी. एस. खर्डे, मेलाणे व पढावद एस. एच. मोरे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image