esakal | धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा १४ हजारांचा टप्पा पार
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा १४ हजारांचा टप्पा पार

कोरोना बळींची संख्या ३७९ आहे. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १६७ तर उर्वरित जिल्ह्यातील २१२ बळींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून बळींची संख्या स्थिरावल्याने दिलासा आहे

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा १४ हजारांचा टप्पा पार

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः जिल्ह्यात आज नवीन १८ कोरोनाबाधितांची भर पडली. याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येनेही १४ हजारांचा टप्पा पार केला. 

आवश्य वाचा- विवाहासाठी सनई चौघडे वाजू लागले; मे मध्ये सर्वाधिक तारखा ! 

जगभरात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. गेल्या आठ महिन्यात या संसर्गाने धुळे शहरासह जिल्हावासीय हैराण आहेत. आज (ता. ४) नवीन १८ बाधित समोर आल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानेही १४ हजाराचा टप्पा ओलांडला. आजअखेर जिल्ह्यात एकूण १४ हजार १३ बाधित झाले आहेत.

कोरोना बळींची संख्या ३७९ आहे. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १६७ तर उर्वरित जिल्ह्यातील २१२ बळींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून बळींची संख्या स्थिरावल्याने दिलासा आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (८७ पैकी ०५), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (४३ पैकी ००, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे २७ पैकी ०६), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (१४२ पैकी ०१), धुळे महापालिका (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १८१ पैकी ०१), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (०८ पैकी ०२), खाजगी लॅब (०७ पैकी ०३). 
 

loading image