धुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Dam

धुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा


सोनगीर : पावसाळ्याचा यंदाचा अंतिम महिना सुरू असून अद्यापही धुळे जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पात (Dam) पाण्याचा उपयुुक्त साठा (Water Level) अवघा 40. 69 टक्के आहे. म्हणजे धरणे सरासरी निम्मेही भरलेले नाहीत. म्हणून पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे (Water Crisis) आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 76.53 टक्के जलसाठा होता. पाण्याची यंदाची ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकल्पात यंदा आजच्या दिवसापर्यंत 30 टक्के कमी जलसाठा आहे.

हेही वाचा: तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहर फ्लो; पाय घसरून तरुण बेपत्ता

जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात सध्या 201.336 दशलक्ष घनमीटर एवढाच जलसाठा आहे. गेल्यावर्षी 376.703 दशलक्ष घनमीटर साठा होता. जूनपासून आजपर्यंत केवळ 1988 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवसापर्यंत 4392 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यातुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने चिंता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात 12 मध्यम व 47 लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता 494. 86 दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता 121.97 दशलक्षघनमीटर एवढी असताना अवघा 30.464 दशलक्षघनमीटर म्हणजे 24.98 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता 471. 43 दशलक्ष घनमीटर असून सध्या 170.872 दशलक्षघनमीटर म्हणजेच 45.82 टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील 12 प्रकल्पांपैकी जामखेडी व कनोली शंभर टक्के भरली आहेत. पांझरेला एकही मोठा पूर न आल्याने व नदीचे पाणी सोनवदला न सोडल्याने सर्वात कमी 2.32 दशलक्षघनमीटर जलसाठा सोनवद प्रकल्पात असून तो अवघा 16.16 टक्के आहे. बहूतांश लघुप्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. 47 पैकी सर्वच लघुप्रकल्पात कमी जलसाठा असून काही पावसाळ्यातही 25 टक्केही भरले नाही. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात अत्यल्प साठा आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील.

हेही वाचा: वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले


आकडे बोलतात -
(प्रकल्प, उपलब्ध जलसाठा व टक्केवारी यानुसार (आकडेवारी दलघमीमध्ये )
1)पांझरा - 29.65 83.23
2)मालनगाव - 9.76 86.14
3) जामखेडी - 12.34 100
4)कनोली - 8.45 100
5)बुराई - 2.65 18.65
6)करवंद - 15.78 86.40
7)अनेर - 34.68 70.39
8)सोनवद - 2.32 16.16
9)अमरावती 6.09 28.66
10)अक्कलपाडा - 17.35 19.53
11)वाडीशेवाडी - 10.58 31.19
12)सुलवाडे - 21.23 32.63
एकूण मध्यम प्रकल्पात - 170.872 45.82
एकूण लघु प्रकल्पात - 30.464 24.98
एकूण जलसाठा. 201.336 40.69

Web Title: Marathi News Dhule District Dam Water Level Low

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..