esakal | धुळे जिल्ह्यात ५८ टक्के मतदान;काही क्षणात सुरु होणार मतमोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

धुळे जिल्ह्यात ५८ टक्के मतदान;काही क्षणात सुरु होणार मतमोजणी

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे: जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) १५ पैकी १४ रिक्त जागा आणि चार पंचायत समित्यांच्या रिक्त ३० जागांसाठी मंगळवारी (ता. ५) निर्धारित वेळेत सरासरी ५८ टक्के मतदान (Voting) झाले. या जागांसाठी अनुक्रमे ४२ पैकी ४१ आणि ७५, असे एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य सुमारे पाच लाख ५० हजार ८५२ मतदारांच्या हाती होते. पैकी जिल्ह्यात सरासरी ५८ टक्के शांततेत मतदान झाले. आज सकाळी दहा पासून मतमोजणीला (Counting of votes) सुरवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढू लागली आहे.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात शंभरावर गुन्हेगार गजाआड

धुळे तालुक्यात सर्वाधिक २३५ मतदान केंद्र होते. त्यातील लळींग परिसरातील सात केंद्राची मतदानाची सांख्यिकीय माहिती रात्री सव्वादहापर्यंत प्राप्त झालेली नव्हती. मात्र, तालुक्यात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अनुमान निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच शिरपूर तालुक्यात ५७.१२ टक्के, शिंदखेडा तालुक्यात ५८.८३ टक्के, साक्री तालुक्यात ५५.५५ टक्के मतदानाची नोंद झाली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..


बोरकुंड (ता. धुळे) येथील गटाची जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या धुळे तालुक्यातील रिक्त ११ पैकी दहा गटांसाठी ३१ पैकी ३०, तर शिंदखेडा तालुक्यातील रिक्त चार गटांसाठी ११, तसेच चार पंचायत समित्यांच्या शिरपूरमधील आठ गणांसाठी १६, शिंदखेडा तालुक्यातील पाच गणांसाठी दहा, साक्री तालुक्यातील नऊ गणांसाठी २७, धुळे तालुक्यातील आठ गणांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. शिंदखेड्यात १५६, साक्रीत ९७, तर शिरपूरमध्ये ६३ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याकामी दोन हजार कर्मचारी गुंतले होते. ही पोटनिवडणूक भाजपविरूध्द महाविकास आघाडी, अशी लढत होत आहे.

loading image
go to top