esakal | धुळेः महाविकास आघाडीतर्फे नेरला रास्ता राको..
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi Movement

धुळेः महाविकास आघाडीतर्फे नेरला रास्ता राको..

sakal_logo
By
सुरज खलाणे

नेर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखिमपुरा घटनेच्या निषेधार्थ नेर म्हसदी फाट्यावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पदाधिकाऱ्यांकडुन सकाळी नेर म्हसदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन (movement) करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

हेही वाचा: धुळेः चार लाखांचा गांजा जप्त, तिघे पोलिसांच्या जाळ्यात

उत्तर प्रदेशातील लखिमपुरा येथे शेतकऱ्यांच्या आंगावर वाहन चालविण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारला होते. त्यानुसार म्हसदी फाट्यावर महाविकास आघाडीतर्फे रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, जि.प.सदस्य आनंदराव पाटील,शिवसेनेचे माजी धुळे तालुका प्रमुख मनिष जोशी,पं.स.सदस्य अंजनाबाई मांगु मोरे,राष्ट्रीवादी कांग्रेस पक्षाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षा प्रितमताई वैभव देशमुख,कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विलास बिरारी आदींनी महामार्गावर घोषणा देत लखिमपुरा येथिल घटनेला जाहीर निषेध करत मनोगत व्यक्त केले.

movement

movement

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त


यावेळी नेरच्या सरपंच तथा धुळे जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा गायत्रीदेवी जयस्वाल जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा मुन्नीबाई मोरे,मांगु मोरे, योगेश गवळे, नारायण बोढरे, मुकुंद साखरे,दिलीप सोनवणे, दिलीप बिरारी,जगन्नाथ सोनवणे,सुमीत जयस्वाल,महेश जयस्वाल,जावेद तांबोळी,दिपक आखाडे,विनायक पाटील,नेर परीसरातील शिवा पाटील राकेश नेरकर,
जगदीश नेरकर,शालिक पोपट नांद्रे, सुनील पाटील, रामचंद्र पाटील,अविनाश पाटील आदी उपस्थित होते.धुळे तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेर पोलीस दुरक्षेत्रातील पी एस आय सागर काळे,पोलीस नाईक प्रमोद ईशी,विलास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल सुमीत चव्हाण,ज्ञानेश्वर गिरासे, कांतीलाल शिरसाठ, होमगार्ड आदींनकडुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले.

loading image
go to top