धुळे जिल्ह्यात आजपासून दुकाने उघडली जाणार

मात्र, पॉझिटिव्हिटीमध्ये वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील,
shops
shops shops

धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना (corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकाने/आस्थापना मंगळवार (ता. १)पासून सकाळी सात ते दुपारी दोन, या कालावधीत येत्या आठवडाभरासाठी उघडण्यास सशर्त मंजुरी देण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. मात्र, पॉझिटिव्हिटीमध्ये वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ठरल्याचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव (Collector Sanjay Yadav) यांनी सांगितले.

( dhule district shops market opened today)

shops
जळगाव जिल्ह्यात बी. टी. बियाण्यांची विक्री सुरू


जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित (Superintendent of Police Chinmay Pandit) , महापालिकेचे आयुक्त अजिज शेख (Municipal Commissioner Aziz Sheikh), अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.

shops
कोरोनामूळे महामार्ग चौपदरीकरणाला सहा महिन्यांची प्रतीक्षा


जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, की व्यापारी, ग्राहकांनीही कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक आस्थापना मालकासह आस्थापनेत कार्यरत कामगारांची दर आठवड्याला कोरोनाविषयक चाचण्या करणे अत्यावश्यक आहे. तसेच दर शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्हिटीचा आढावा घेवून पॉझिटिव्हिटी वाढताना दिसल्यास शिथिल केलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार होईल. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाहीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असतील. नियमांची अंमलबजावणी होते किंवा कसे, हे तपासण्यासाठी महापालिका, पोलिस व प्रांत अधिकारी यांनी नेमलेले क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त फिरती पथके गठित करावीत. तसेच व्यापक जनजागृतीसाठी मोहीम राबवावी. व्यापारी महासंघाने आपल्या स्तरावर पथके गठित करून व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेली गृहविलगीकरणाची सुविधा पूर्णत: बंद करून अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.
श्री. बंग यांनी सांगितले, की सर्व व्यापारी बांधव राज्य शासनाच्या नियमांचे पालन करतील. तसेच दर आठवड्याला कोरोना चाचणी करून घेतील. प्रशासनाच्या सहकार्यासाठी व्यापाऱ्यांची पथके गठित करण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com