नशेचे परिणाम...नपुंसकता....नंतर तलाक, घटस्फोट! 

tobaco
tobaco

धुळे : नशेतून आपल्याच दुनियेत रमणाऱ्या लहानग्या मुलांसह तरुणांना दूरगामी परिणामांची चिंता नसते. विवाहापूर्वी नशेच्या आहारी गेलेली मुले वैवाहिक वयावेळी अनेक शारीरिक समस्यांनी त्रस्त असतात. विवाह झाल्यानंतर जोडीदाराला पौरुषत्वाबाबत वास्तव कळते. तारुण्यात नशेच्या आहारी गेल्यास काही वर्षांत त्यांना जोडीदार सोडून निघून जातो. याचाच अर्थ नशेचे परिणाम... नपुंसकता आणि त्यातून तलाक, घटस्फोटांत दिसून येतात. हे वास्तव सांगण्याचे धाडस नशेखोरांमध्ये नसल्याने हा प्रश्‍न सामाजिक पातळीवर अद्याप दुर्लक्षित दिसतो. 


नशेच्या औषधी गोळ्या, सिरपच्या अतिसेवनातून गंभीर परिणाम होतात. तसेच नशेच्या इतर वस्तू, पदार्थांतून लहान मुलांवर वाईट परिणाम होतात. नशेच्या गोळ्या, औषधे, वस्तू, पदार्थांची माहिती "सकाळ'ने वेळोवेळी दिली आहे. 
स्वस्तात नशा आणणाऱ्या औषधी, गोळ्यांचे सेवन करणाऱ्या नशेबाजांची संख्या शहरात वाढती आहे. चांगल्या परिवारातील काही तरुण वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात आहेत. विविध कंपन्यांची "पेनकिलर' औषधे व गोळ्यांचा वापर गुंगी, नशेसाठी करणारे तरुण समाजासाठी घातक ठरत आहेत. 
"अरे घे रे, काही होत नाही... हे हुंगल्यावर वेगळीच मजा मिळते...तू वेगळ्या दुनियेत जाशील...', असे मोठ्या मुलांकडून लहान मुलांना सांगितले जाते. त्यातून नशेखोरीची चटक लावली जाते. शहरातील मुस्लिमबहुल, अल्पविकसित, उच्चभ्रू वस्तीतील मुले नशेला बळी पडत आहेत. यातून गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. 
पेट्रोल हुंगूनही नशा करणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. अशा प्रकारे नशा करणाऱ्यांमध्ये शहरातील रस्त्यांवरील सुमारे तीनशेहून अधिक मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
नशेखोर पतीला "तलाक' देण्याचे प्रमाण वाढते आहे. त्या प्रमाणे कमीअधिक प्रमाणात इतर संवर्गात घटस्फोटाचे प्रकार घडतात. केवळ बदनामीच्या हेतूने या गंभीर स्थितीची संबंधित कुणाकडूनही वाच्यता केली जात नाही. परंतु, असले प्रकार वाढीस लागल्याने जीवनाबाबत टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकारही घडत आहेत. नेहरू चौक परिसरात नशेसह परिणामांमुळे काही महिन्यांत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. उजेडात न येणाऱ्या घटनांचे प्रमाणही अधिक असल्याची शक्‍यता वर्तविली जाते. 
 
"पंक्‍चर'चे सोल्यूशन धोकादायकच... 
"पंक्‍चर' काढण्याच्या सोल्यूशनमध्ये "टॉल्यून' रसायन असते. ते कमालीचे मादक असते. नशेखोर ट्यूबमधील सोल्यूशनचे काही थेंब हातरुमालावर घेतात आणि तो नाका- तोंडाला लावून ओढतात. त्यामुळे छोट्या मेंदूवरील नियंत्रण सुटत जाते, तशी नशा चढत जाते. सरासरी पंधरा ते चाळीस रुपयांपर्यंत मिळणाऱ्या ट्यूबमुळे हृदयविकारासह मेंदूवर परिणाम होत असल्याचा धोका नशेखोरांना ठाऊक नसतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com