जिप,पंचायत समीतीची पोटनिवडणूक; धुळे तालुक्यात शिवसेनेचा जल्लोष

महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून एकूण २० कोटींच्या निधीतील कामे मंजूर करून आणली आहेत.
election
election

धुळे : जिल्ह्यात सर्वाधिक रोमहर्षक होत असलेल्या धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटातील ११ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी (By-election) सोमवारी माघारी व चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली. त्यात बोरकुंड गटातील शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवार शालिनी भदाणे या बिनविरोध निवडून आल्या. तालुक्यात भाजपविरोधात (BJP) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटप करत शह देण्याचा निर्णय घेतला आहे.

election
पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे प्रसिध्द

धुळे तालुक्यातील पोटनिवडणुकीसाठी १०७ उमेदवार रिंगणात होते. गटातील ८० पैकी ४९ जणांनी माघार घेतल्याने आता ३१, तर गणातील ६० पैकी ३८ जणांनी माघार घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात आहेत. लामकानी गटात भाजपच्या धरती देवरे, शिवसेनेच्या मीनाबाई पाटील, कापडण्यात भाजपचे रामकृष्ण खलाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पाटील, अपक्ष दिनकर माळी, फागण्यात भाजपच्या अश्‍विनी पवार, काँग्रेसच्या नयना पाटील, अपक्ष माया पाटील, नगावला भाजपचे राघवेंद्र पाटील, काँग्रेसचे सागर पाटील, वंचित आघाडीचे रवींद्र अहिरे, कुसुंब्यात भाजपचे संग्राम पाटील, वंचित आघाडीच्या अभिलाषा देवरे, राष्ट्रवादीच्या वैशाली शिंदे, अपक्ष आधार हाके, नेरला भाजपचे संजय माळी, काँग्रेसचे आनंदा पाटील, बोरविहीरला भाजपच्या अश्‍विनी पाटील, काँग्रेसच्या मोतनबाई पाटील, अपक्ष मनिषा गवळी, मुकटीत भाजपच्या कल्पना पाटील, राष्ट्रवादीच्या मीनल पाटील, शिरूडला भाजपचे आशुतोष पाटील, काँग्रेसचे बापूराव पाटील, अपक्ष प्रकाश बिऱ्हाडे, रतनपुरा येथे भाजपच्या कविता पाटील, शिवसेनेच्या अनिता पाटील, अपक्ष हर्षदा पाटील, मीना माळी, रेखा राजपूत आदी रिंगणात आहेत.

election
दुर्दैवी घटना: माहेरी निघालेल्या मायलेकास गॅस टँकरने चिरडले



बाळासाहेब भदाणे विकासरत्न
बोरकुंडसह या गटात शिवसेनेच्या शालिनी भदाणे व बाळासाहेब भदाणे या दाम्पत्याने गेल्या दीड वर्षांत तीन ते चार कोटींच्या निधीतून विकास कामे केली. तसेच महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून एकूण २० कोटींच्या निधीतील कामे मंजूर करून आणली आहेत. बाळासाहेब भदाणे विकासरत्न असल्याने त्यांना मंजूर कामे करू दिली जावीत. त्यामुळे का आव्हान दिले जावे, असा प्रश्‍न उपस्थित करत गावासह गटासाठी भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, अशी गळ ग्रामस्थांनी घातली. यानंतर परस्पर सामंजस्यातून शालिनी भदाणे या बिनविरोध निवडून आल्याने जल्लोष झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com