esakal | चक्‍क शेतमालाची चोरी करत केली विक्री

बोलून बातमी शोधा

dhule

कावठी येथील शिवारातून शेतमाल चोरी करून तो विक्री करणारी एक टोळीच कार्यरत आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत होते.

चक्‍क शेतमालाची चोरी करत केली विक्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कावठी (ता. धुळे) शिवारातून कापूस व भुईमुगाची चोरी करीत पिकअप वाहनातून वाहून नेत व्यापाऱ्यास विक्री केली. याबाबत दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्यांनी 69 हजारांच्या शेतमालाची विक्री केल्याची कबुलीही दिली. या दाखल गुन्ह्यातील दोन संशयिताना सोनगीर पोलिसांच्या ताब्यात दिले. यापैकी एक सराईत गुन्हेगार असून, त्याने कारावास भोगला आहे. 

कावठी येथील शिवारातून शेतमाल चोरी करून तो विक्री करणारी एक टोळीच कार्यरत आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत होते. गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने रविवारी (ता.16) सकाळी अकलाड-मोराणे येथून सराईत गुन्हेगार भिका सदू भोई (रा. लोंढानाला अकलाड-मोराणे) साथीदार अशोक गोमा अहिरे (रा.अकलाड) यांना ताब्यात घेतले. संशयितांची कसून चौकशी केली असता 69 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. यात एक संशयित अद्यापही फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे. अटकेतील दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व पथकातील सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार सुनील विंचूरकर, संजय पाटील, संदीप थोरात, वसंत पाटील, चेतन कंखरे, मनोज पाटील, किशोर पाटील, योगेश जगताप, दीपक पाटील, विलास पाटील, गुलाब पाटील,केतन पाटील यांनी ही कारवाई केली.